शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी केले आदेशाचे उल्लंघन; हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी
2
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
3
"माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
4
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
5
मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
6
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
7
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
8
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
9
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
10
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
11
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
12
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
13
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
14
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा
15
७३ हजार सॅलरी असणाऱ्या पत्नीने पतीकडे मागितली पोटगी; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
16
Women's World Cup 2025 Prize Money : महिला क्रिकेटला 'अच्छे दिन'; पुरुषांपेक्षाही अधिक बक्षीस
17
ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर
18
सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
19
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
20
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

अवैध सावकारी : ४३० धनादेशांसह ३४ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 10:51 IST

शनिवारी रात्री संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांचे कार्यालय तसेच निवासस्थानी छापेमारी करून तब्बल ३३ लाख ४० हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील दोन बड्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचा व्यवहार सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांचे कार्यालय तसेच निवासस्थानी छापेमारी करून तब्बल ३३ लाख ४० हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली. या दोन ठिकाणावरून ४३० धनादेश व खरेदीखतही जप्त करण्यात आले आहेत.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांच्या अवैध सावकारी असल्याच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधकांच्या तीन पथकाने तीन दिवस छापेमारी केली. यामध्ये संतोष राठी यांच्या टिळक रोडवरील राजस्थान भवन येथील कार्यालयातून तसेच मराठा नगरातील राजराजेश्वर हाउसिंग सोसायटी या निवासस्थानावरून २४ लाख ९४ हजार ६९७ रुपये रोख ८९ धनादेश तसेच काही खरेदीखत जप्त करण्यात आले. त्यानंतर राजेश घनश्यामदास राठी यांच्या रामनगर येथील आलिशान बंगल्यातून ८ लाख ३४ हजार ५०५ रुपये रोख जप्त करण्यात आले. यासोबतच तब्बल ३४१ धनादेश आणि काही खरेदीखतही जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही राठींकडून धनादेश, चिठ्ठ्या, संगणक आढळले असून, मोठ्या प्रमाणात व्यवहाराचे काही दस्तावेजही असल्याची माहिती आहे. ही झाडाझडती महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात एस. डब्ल्यू. खाडे, एम. एस. गवई, एस. पी. पोहरे यांच्या पथकाने केली. या छापेमारीत दस्तावेज जप्त करण्यात आले असून, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक या प्रकरणात आता काय कारवाई करतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

आयकर खात्यानेही घालावे लक्षसंतोष राठी आणि राजेश राठी यांच्याकडे तब्बल ४३० धनादेश, आणि खरेदीखत आढळल्याने या प्रकरणात आयकर खात्यानेही लक्ष घालण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आयकर खात्याने यामध्ये लक्ष दिल्यास आणखी मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणात तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडूनही तपास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोला