अकोला : अवैध बांधकाम केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी गजानन पांडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये रायली जीन भागामध्ये आरो पी संजय अग्रवाल व सचिन अग्रवाल यांनी नकाशाप्रमाणे मंजूर बांधकाम न करता, त्यापेक्षा अतिरि क्त बांधकाम करून नगररचना कायद्याचे उल्लंघन केले. दोघांही आरोपींना महापालिकेने नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्यास बजावले होते; परंतु दोघांनी मनपाकडे स्पष्टीकरण सादर केले नाही, असे म्हटले आहे. पांडे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी संजय व सचिन अग्रवाल यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ नुसार गुन्हा दाखल केला.
अवैध बांधकामप्रकरणी दोघांवर गुन्हा
By admin | Updated: September 26, 2014 01:57 IST