शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:26 IST

अकोला: न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर रूपेश सुधाकर तेलगोटे याने गत सहा महिन्यांपासून शेकडो प्रेमी युगुल तसेच महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.

अकोला: न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर रूपेश सुधाकर तेलगोटे याने गत सहा महिन्यांपासून शेकडो प्रेमी युगुल तसेच महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.अकोल्यातील काही हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडरचे काम करणाऱ्या रूपेश सुधाकर तेलगोटे नामक बोगस डॉक्टरने न्यू भागवत प्लॉट परिसरात ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटल सुरू केले. त्याने पातूर येथील रहिवासी वैशाली संजय गवई हिला परिचारिका म्हणून कामावर ठेवले. तिच्या माध्यमातून अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्यांचा शोध घेणे आणि त्यांचे गर्भपात करण्याचा काळा धंदा या हॉस्पिटलमध्ये राजरोस सुरू केला. गर्भपातासाठी लागणाºया किट्स आणून देण्यासाठी रवी भास्कर इंगळे यालाही या साखळीत सामावून घेतले. या तिघांनी शहरातील काही नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून या हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भपाताचा सपाटाच सुरू केला. गत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून गर्भपाताचा बाजार त्यांनी या हॉस्पिटलमध्ये मांडला होता. प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने काही प्रेमी युगुलांमधील युवतींच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे; मात्र तक्रार करण्यासाठी कुणी समोर न आल्याने अवैधरीत्या सुरू असलेले हे बोगस हॉस्पिटल आणि बोगस डॉक्टरचे प्रताप सुरूच होते.पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी या गंभीर प्रकरणाचा गोपनीयरीत्या अभ्यास करून तसेच डॉक्टरच्या डिग्रीसह हॉस्पिटलची नोंदणी व परवानग्यांची माहिती घेतली असता हे हॉस्पिटल अवैध असून, त्यामध्ये चालणारे प्रकार बेकायदेशीर असल्याचे उघड झाले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, विशेष पथकाची ही राज्यातील अशा प्रकारची पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे. १५ दिवस चालली सूक्ष्म तपासणीविशेष पथकाला बेकायदेशीर हॉस्पिटल तसेच बोगस डॉक्टरची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गत १५ दिवसांपासून या ठिकाणावर पाळत ठेवली. त्यानंतर संपूर्ण तांत्रिक अभ्यास करून त्यांनी या बोगस हॉस्पिटलवर कारवाई केली. विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टर तसेच अवैधरीत्या गर्भपात करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

रूपेश तेलगोटे  हॉस्पिटलमध्ये होता कामाला

रूपेश तेलगोटे हा शहरातील काही नामांकित हॉस्पिटल मध्ये कम्पाउंडर म्हणून कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे. तेलगोटे हा डॉक्टरच नसल्याची माहिती असतानाही त्याला सहकार्य करणे आणि त्याच्याकडे गर्भपात करण्यासाठी रुग्ण पाठविणाºया डॉक्टरांवरही कारवाई होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर