शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गर्भपाताचा प्रयत्न; महिला डॉक्टरसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 19:31 IST

शिवनी येथील महिला डॉक्टर आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अवैध गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

ठळक मुद्दे ही डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली.बनावट गर्भवती महिलेला डॉ. रोशनी गावंडे हिच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठविले.सुनंदा आढे हिने महिलेला काही गोळ्या व औषधे दिले आणि महिलेकडून १४ हजार रूपये घेतले.

अकोला : शिवनी येथील महिला डॉक्टर आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अवैध गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. मनपा आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत महिला डॉक्टरसह एक दलाल आणि न्यू तापडीयानगरातील एका महिलेस पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारी रोडवरील शिवणी येथे डॉ. रोशनी गावंडे(देशमुख) हिचा दवाखाना असून, तिच्याकडे बीएचएमएसची पदवी आहे. ही डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषधी प्रशासनाच्या सहकार्याने शुक्रवारी दुपारी बनावट गर्भवती महिलेला डॉ. रोशनी गावंडे हिच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठविले. यावेळी डॉ. गावंडे हिने या महिलेची तपासणी केली आणि गर्भपातासाठी महिलेकडून दहा हजार रूपये उकळले. त्यानंतर या महिलेला दलाल गोपाल माधव गायकवाड((रा. विठ्ठल नगर मोठी उमरी) याच्याकडे पाठविले. याठिकाणी महिला गेल्यावर गायकवाड हा महिलेला सुनंदा महादेव आढे(लाजुरकर) रा. न्यू तापडिया नगर हिच्याकडे घेऊन गेला. याठिकाणी सुनंदा आढे हिने महिलेला काही गोळ्या व औषधे दिले आणि महिलेकडून १४ हजार रूपये घेतले. पोलिसांना खात्री झाल्यावर, त्यांनी याठिकाणी छापा घातला आणि डॉ. रोशनी गावंडे हिच्यासह दलाल गोपाल गायकवाड, सुनंदा आढे हिला ताब्यात घेतले. तिघांनाही स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून महागड्या गर्भपाताच्या किट्स, गोळ्या व औषधी व सलाईनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. महिला डॉक्टर व तिचे दोन एजंट यांनी आतापर्यंत अनेक अवैध गर्भपात केले आहेत. किती वर्षांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. आतापर्यंत किती अवैध गर्भपात केले. याची पोलीस चौकशी करीत आहेत. पीसीपीएनडीटी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख, पीएसआय छाया वाघ, पोलीस कर्मचारी गणेश पांडे, सचिन काटकर, फिरोज खान, अश्विन सिरसाट यांनी केली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAbortionगर्भपात