शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

'आयएल अ‍ॅण्ड 'एफएस' आर्थिक संकटात; महामार्ग चौपदरीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:21 IST

इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अ‍ॅण्ड एफएस) आर्थिक संकटात सापडल्याने, गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देआयएल अ‍ॅण्ड एफएस ही मूळ कंपनी आणि तिच्या सर्व उप कंपन्या गत काही काळापासून कर्जांवरील व्याज चुकविण्यातही असमर्थ ठरत आहेत. सध्याच्या घडीला या कंपनीवर ९१ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्ज आहे. कंपनी तीन उप कंत्राटदारांची देणी चुकवू शकलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी गत काही महिन्यांपासून काम थांबविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हाजिरा-देवगढ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या अमरावती-चिखली टप्प्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट घेतलेल्या अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड कंपनीचे पितृत्व असलेल्या आयएल अ‍ॅण्ड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्कस् इंडिया लिमिटेड या कंपनीची मूळ कंपनी असलेली इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अ‍ॅण्ड एफएस) आर्थिक संकटात सापडल्याने, गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले आहे.हाजिरा-देवगढ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ पूर्वी सुरत-कोलकाता किंवा मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ म्हणून ओळखल्या जात होता. या महामार्गाच्या विदर्भातील टप्प्यांपैकी भंडारा-नागपूर आणि नागपूर-अमरावती या टप्प्यांचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून, अमरावती-चिखली या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामाचे भूमिपूजन आॅक्टोबर २०१५ मध्ये झाले होते आणि कंत्राटातील अटीनुसार अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडला सदर काम मे २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते; मात्र सध्याची स्थिती बघू जाता ते लक्ष्य गाठणे अशक्यप्राय दिसत आहे.आयएल अ‍ॅण्ड एफएस ही मूळ कंपनी आणि तिच्या सर्व उप कंपन्या गत काही काळापासून कर्जांवरील व्याज चुकविण्यातही असमर्थ ठरत आहेत. गत काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रचंड घसरणीमागे आयएल अ‍ॅण्ड एफएसचे आर्थिक संकट हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. तीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या कर्जात गत तीन वर्षात ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला या कंपनीवर ९१ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्ज आहे. कर्जाचा भार कमी करण्यासाठी कंपनीने काही मालमत्ता आणि काही सुरू असलेले प्रकल्प विकायला काढले आहेत; मात्र सदर प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान वर्षभराचा वेळ लागणार असल्याने तातडीने दिलासा मिळण्याची अजिबात शक्यता नाही.आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड ही कंत्राटदार कंपनी तीन उप कंत्राटदारांची देणी चुकवू शकलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी गत काही महिन्यांपासून काम थांबविले आहे. परिणामी महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठप्प पडले आहे. चौपदरीकरणासाठी जागोजागी रस्ता खोदून ठेवलेला असल्याने गत काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आणि जोपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघात कमी होण्याची सुतराम शक्यता नाही.सदर रस्त्याच्या चौपदरीकरणास सुरुवातीपासूनच ग्रहण लागले असून, २०१२ मध्ये सदर कंत्राट घेतलेल्या एल अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीने, शासनाने भूसंपादन वेळेत पूर्ण न केल्याच्या कारणास्तव सदर काम सोडून दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये, एल अ‍ॅण्ड टीच्या कंत्राटापेक्षा तीन पट जास्त रकमेचे कंत्राट आयएल अ‍ॅण्ड एफएसला देण्यात आले होते. आता सदर कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने सदर रस्त्याचे भाग्य केव्हा उजाडणार, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6