शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त सर्व्हे हवा असेल, तर २५ कोटी रुपये जमा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:10 IST

२२ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम जमा करावी, अन्यथा त्यानंतर कारवाईचे सर्व पर्याय खुले असल्याचा सज्जड दम आयुक्तांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवत शहरात ७० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे अनधिकृत भूमिगत फोर-जी केबल व पाइप टाकणाऱ्या मोबाइल कंपन्यांना संयुक्त सर्व्हे हवा असेल, तर आधी मनपाकडे २५ कोटी रुपये जमा करा, त्यानंतर सर्व्हेचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दात मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम, आयडिया-व्होडाफोन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावले. २२ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम जमा करावी, अन्यथा त्यानंतर कारवाईचे सर्व पर्याय खुले असल्याचा सज्जड दम आयुक्तांनी दिला.महापालिका प्रशासनाच्या परवानगीला ठेंगा दाखवत संपूर्ण शहरात मोबाइल कंपन्यांनी भूमिगत व ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे टाकले. संबंधित कंपन्यांनी मनपाचे सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान केल्याचे समोर येताच प्रशासनाने खोदकाम करून अनधिकृत केबलचे जाळे शोधून काढले. मनपा आयुक्तांनी मोबाइल कंपन्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम सुरूच ठेवल्यामुळे कंपन्यांनी दंडात्मक रक्कम जमा करण्याच्या मुद्यावर धावाधाव सुरू केली आहे.मनपाच्या कारवाईमुळे संपूर्ण शहरातील मोबाइल सेवा कोलमडत असल्याचे ध्यानात येताच दूरसंचार तथा माहिती व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रिलायन्स जिओ, आयडिया-व्होडाफोन मोबाइल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी १३ फेब्रुवारी रोेजी नागपूर येथे आयोजित बैठकीत महापालिका आयुक्तासोबत प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती आहे.

आम्ही केवळ पाइप टाकले!शहरात आमच्या ‘व्हेंडर’ने केबल न टाकता केवळ पाइप टाकल्याचे रिलायन्सच्या अधिकाºयांनी बैठकीत नमूद केल्याची माहिती आहे. त्यावर शहरात खोदकाम करून पाइप (डक) टाकण्यासाठी मनपाच्या परवानगीची गरज भासली नाही का, असा सवाल आयुक्त संजय कापडणीस यांनी करीत कंपनीच्या मनमानी कारभाराचा समाचार घेतला.

‘ते’ म्हणाले, केबल टाकलेच नाही!नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत रिलायन्स जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी शहरात भूमिगत केबल टाकलेच नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. केबल टाकलेच नसल्याचा दावा करता, मग मनपाच्या कारवाईत मोबाइल सेवा कशी खंडित झाली, याचा खुलासा करण्याची मागणी आयुक्त कापडणीस यांनी केली असता, कंपनीच्या अधिकाºयांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका