शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाच झाडे लावून संगोपन केल्यास घरपट्टी माफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:38 IST

पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे.

- पंकज सातपुते लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून वृक्षारोपणासह संगोपनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ग्रामपंचायतने अभिनव योजना सुरू केली आहे. पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे. वृक्षारोपण करून पाच वर्षे झाडे जगविणाºया ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोफत देण्यात येणार आहेत तसेच त्यांच्या दोन मुलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे. महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करते; परंतु लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी मोजकेच जगविले जातात. हे सर्व वृक्ष जगविण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय विभागाची असते; परंतु वृक्ष लागवड झाल्यावर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. याचा अभ्यास केल्यावर मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर ग्रामपंचायतने एक आगळा-वेगळा मार्ग शोधला आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम वृक्ष लागवडीसाठी रोल मॉडेल ठरणार असून, राजनापूर ग्रामपंचायतने गावातील नागरिकांनी आपल्या परिसरात किंवा रस्त्याच्या कडेला जर पाच झाडे लावली व वृक्ष संगोपन केले तर त्याला दोन वर्षांचा घरकर पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ग्रामसेवक संदिप गाडेकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतने केलेला हा उपक्रम एकदम चांगला आहे. यामुळे गावात हिरवळ राहील, जमिनीची धूप थांबेल. अनियमित पाऊस चांगला पडेल आणि या उपक्रमाने लोकांची सहभागाची भावना वाढेल.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत