शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'वान'च्या पाण्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:24 IST

वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्‍यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न पेटला शेतकर्‍यांसाठी प्रहार करणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमानसागर धरणाचे पाणी शहरातील अमृत योजनेला देण्याचा घाट रचला गेला; परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचे सिंचन सोडून पाणी दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण धरण हनुमानसागर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना वरदान ठरलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धरण १00 टक्के भरले असताना यावर्षी रब्बी सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होताच शेतकर्‍यांनी पाण्यासाठी आंदोलन, निवेदन, अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या; परंतु मार्ग निघत नव्हता. वान हनुमानसागराचे  पाणी जळगाव जा., संग्रामपूर, शेगाव, तेल्हारा व अकोटसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८४ खेडी पाणी पुरवठय़ासाठी दिले जात आहे. त्यातच आता पुन्हा अकोला शहरातील अमृत योजनेकरिता पाणी नेण्याचा घाट असल्याने तालुक्यातील १५ हजार हेक्टर शेती वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे मूळ उद्देश असलेल्या सिंचनाला खोडा बसणार आहे. या सर्व प्रकाराने परिसरातील  शेतकरी संघटना, शिवसेना यांनी आंदोलने केली; परंतु तोडगा निघत नव्हता. वानच्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठीच वापर व्हावा, याकरिता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडली. यावेळी तेल्हारा तालुक्यातील प्रहारचे कार्यक्रर्ते राजेश पाटील, तुषार पुंडकर, विनोद खुमकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांच्यावतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी आधी पाणी सिंचनासाठी द्यावे, नंतर शहरातील योजनांना द्यावे, असे होत नसेल तर शेतकर्‍यांसाठी प्रहार संघटना रक्त सांडायचे काम पडल्यास मागे हटणार नाही. त्याकरिता आधी सिंचन नंतर इतर योजना, असे खडे बोल सुनावले. सिंचनासाठी दोन पाणी देण्याचे अधिकारी सांगत असले तरी दोन पाण्यात पीक येत नाही. त्यामुळे सर्वतोपरी शेतकरी सिंचन विचार व्हावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात वानचे पाणी मिळण्याचे दिसते. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूTelharaतेल्हारा