शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डंम्पिंग ग्राउंडची समस्या निकाली न काढल्यास गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:36 IST

अकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत....

ठळक मुद्देमनपा विरोधी पक्षनेता साजिद खान यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी शनिवारी दिला आहे.नायगावस्थित महापालिकेच्या मालकीच्या जागेवर कचºयाची साठवणूक केली जाते. कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, जलस्रोत दूषित झाले आहेत. प्रक्रिया करून कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक नागरिकांसह विविध संघटनांनी आजपर्यंत महापालिकेला असंख्य निवेदने सादर केली. त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून नागरिकांनी मनपाच्या घंटा गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार निंदनीय व अशोभनीय असला, तरी आजपर्यंत कचºयाची समस्या निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांसह प्रशासनाने काय उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सत्ताधाºयांवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. नागरिकांनी घंटा गाड्यांवर दगडफेक का केली, यावर सत्ताधारी व प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नागरिकांना हातात दगड घेण्यास भाग पाडणाºया सत्ताधारी पक्षातील पदाधिकाºयांवर गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, असा सवाल उपस्थित करीत डंम्पिंग ग्राउंडची समस्या तातडीने निकाली न काढल्यास सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेता खान यांनी दिला आहे.