शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत संयुक्त खाते असेल, तरच मिळतील गणवेशाचे पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:39 IST

अकोला: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे अनिवार्य असले, तरी शासनाच्या क्लिष्ट निकषांमुळे मुख्याध्यापकांच्या नाकीनऊ आले आहेत. बँकेमध्ये विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडल्यानंतर व शालेय गणवेशाच्या खरेदीची पावती सादर केल्यानंतरच मुख्याध्यापकांकडून

ठळक मुद्देविद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने हवी नोंदप्रगती अहवाल घेतला का?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे अनिवार्य असले, तरी शासनाच्या क्लिष्ट निकषांमुळे मुख्याध्यापकांच्या नाकीनऊ आले आहेत. बँकेमध्ये विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडल्यानंतर व शालेय गणवेशाच्या खरेदीची पावती सादर केल्यानंतरच मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. या प्रकारामुळे अद्यापपर्यंत केवळ १0 ते १२ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी बँकेत खाते उघडल्याची माहिती आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. यामध्ये शालेय शुल्क, गणवेश, पुस्तके, दिव्यांग विद्यार्थ्यांना गरजू साहित्य, औषधींचे वितरण आदींचा समावेश आहे. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही भक्कम बाजू असली, तरी दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या दर्जावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातात. मनपा शाळांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना शालेय गणवेश, पुस्तकांचे तातडीने वितरण करून मूलभूत सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित आहे. शासनाचे धोरण पाहता याठिकाणी नेमका उलटा प्रकार होत असल्याचे चित्र समोर येत आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांंच्या शालेय गणवेशासाठी सर्व शिक्षा अभियानमधून निधीची तरतूद केली जाते. एका विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्यासाठी ४00 रुपयांची तरतूद आहे. मात्र ही रक्कम अदा करण्याची पद्धत मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. शालेय गणवेशाचे पैसे हवे असतील, तर बँकेत विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाते उघडल्यानंतर स्वत:च्या खिशातून चारशे रुपये खर्च करून, त्याची पावती मुख्याध्यापकांना दाखवावी लागेल. त्यानंतरच मुख्याध्यापकांकडून चारशे रुपये खात्यात जमा केले जातील. हा उफराटा प्रकार पाहता मनपा शाळेतील ७ हजार ३00 विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंंत केवळ दहा ते बारा टक्के विद्यार्थ्यांंनीच बँकेत खाते उघडल्याची माहिती आहे. 

प्रगती अहवाल घेतला का?महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांंना शालेय गणवेश वाटप करणे शिक्षण विभागाला अनिवार्य आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात कधीचाच वळती करण्यात आला आहे. असे असताना शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून गणवेश वाटपाचा प्रगती अहवाल घेणे अपेक्षित आहे. शिक्षणाधिकार्‍यांचे कामकाज पाहता आजपर्यंंत किती शाळांनी प्रगती अहवाल सादर केला आणि त्यावर शिक्षणाधिकार्‍यांनी काय निर्णय घेतला, याबाबत प्रशासनाने खुलासा करण्याची गरज आहे.