शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी आजारी असल्यास गोवर, रुबेला लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 15:10 IST

अकोला : रुबेला, गोवर लसीकरणानंतर विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना विविध भागातून समोर येत आहेत; परंतु ज्या विद्यार्थ्यांना ही समस्या होत आहे, त्यातील बहुतांश विद्यार्थी दीर्घ आजारी किंवा मेंदूशी निगडित समस्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

- प्रवीण खेतेअकोला : रुबेला, गोवर लसीकरणानंतर विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना विविध भागातून समोर येत आहेत; परंतु ज्या विद्यार्थ्यांना ही समस्या होत आहे, त्यातील बहुतांश विद्यार्थी दीर्घ आजारी किंवा मेंदूशी निगडित समस्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी लसीकरण घेऊ नये, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.गोवर, रुबेला दुहेरी लसीकरण पहिल्यांदाच राबविण्यात येत असून, त्यावर अफवांचे सावट पसरले आहे. अशातच लसीकरणानंतर अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना राज्यातील विविध भागातून समोर आल्या आहेत. आरोग्य विभागाने सतर्कता दाखवत त्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार केला; पण उपचारादरम्यान यातील बहुतांश विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या आजाराची समस्या असून, त्याचा औषधोपचारही सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी असताना त्यांना गोवर, रुबेला लसीकरणामुळे शरीरावर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचेही आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे लसीकरणापूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक आहे. यामध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.पालकांची भूमिकागोवर, रुबेला लसीकरणाच्या दिवशी पालकांनी शिक्षकांसह डॉक्टरांना पाल्याच्या आजारासंदर्भात माहिती द्यावी, आपल्या पाल्यावर सुरू असलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना दिल्यावर त्यांच्या सल्यानुसारच गोवर, रुबेलाची लस द्यावी, असे आवाहनदेखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.या समस्या असल्यास लसीकरण टाळा!हृदयविकारअस्थमामेंदूशी निगडित आजारटायफॉइडमिर्गी, फिट्सकिडनीच्या समस्याकिंवा इतर दीर्घ आजार 

शासनाच्या गाइडलाइन्सनुसार विद्यार्थ्यांना दीर्घ आजार किंवा मेंदूशी निगडित आजार असल्यास त्यांना गोवर, रुबेला लसीकरण नाही. लसीकरणापूर्वी पालकांनी डॉक्टरांना आपल्या पाल्याच्या आरोग्याशी निगडित समस्या सागाव्यात. त्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोवर, रुबेलाची लस द्यावी.- डॉ. फारूख शेख, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला