शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आयात धोरण न बदलल्यास मूग-उडीद डाळीचे भाव तिपटीने वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:34 IST

- संजय खांडेकर अकोला : ओल्या दुष्काळामुळे मूग-उडीदचे प्रचंड नुकसान झाले असून, अत्यल्प साठा बाजारपेठेत येत आहे. एकीकडे नवीन ...

- संजय खांडेकर

अकोला : ओल्या दुष्काळामुळे मूग-उडीदचे प्रचंड नुकसान झाले असून, अत्यल्प साठा बाजारपेठेत येत आहे. एकीकडे नवीन पीक आले नाही अन् दुसरीकडे सरकारने आयात धोरणात अद्याप बदल केलेला नसल्याने उडीद आणि मूग डाळीचे भाव तिपटीने वाढण्याचे संकेत आहे.परतीच्या पावसाने यंदा उशिरापर्यंत मुक्काम ठोकल्याने तयार झालेले पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले, त्यामुळे यंदा मूग आणि उडीद बाजारपेठेत अत्यल्प आहे. दरम्यान, भारत सरकारने ३१ आॅक्टोबरपर्यंतच धान्याचे इम्पोर्ट (आयात) सुरू ठेवले. आता नव्याने येणारा मूग-उडीदचा विदेशी कोटा घेण्यासाठी कोणतेही नवीन धोरण सरकारने आखलेले नाही. दरवर्षी म्यानमारमधून उडीद आणि आफ्रिकेतून मुगाचा साठा येत असतो, तो आलादेखील; मात्र आलेला साठा पुरेसा नाही. सोबतच यंदा देशांतर्गत पीक नाहीसारखे असल्याने आणि आयात धोरणात बदल होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास दोन्ही कडधान्याच्या डाळी महाग होण्याचे संकेत आहे. त्याची चाहूल बाजारात जाणवू लागली आहे. बाजारात येत असलेल्या मुगाला ५१०० पासून तर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. उडदाला ४५०० पासून तर ६५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. दोन्ही कडधान्याचे भावही वधारणार असल्याचे संकेत आहेत.-म्यानमार आणि आफ्रिका दोन्ही देशात सध्या मूग-उडीदचे भाव कमी असून, केंद्र शासनाने आयातीचा नवीन कोटा वाढविला पाहिजे, त्यामुळे दोन्ही डाळीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अन्यथा दोनशे रुपयांपर्यंत डाळींचे भाव पोहोचण्याची शक्यता आहे.-वसंत बाछुका,उद्योजक अकोला.मूग-उडीदला मागणी कशासाठी..ईडली, डोसा, पापळ, वडे आदी पदार्थ दररोजच्या खाण्यात हॉटेलींगमध्ये असते. त्यामुळे तूर डाळीप्रमाणेच मूग-उडीदला मोठी मागणी आहे. जर मूग-उडीदच्या डाळीचे भाव वधारले तर त्यापासून तयार होणाºया उपरोक्त पदार्थांचे भावही वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन दिवसांत उडीद डाळीचे भाव वधारलेमागिल काही दिवसांआधीपर्यंत उडीद डाळीचे भाव ८० ते ९२ रुपये किलो प्रमाणे होते; मात्र उडीदमध्ये येत असलेला तुटवडा लक्षात येताच उडीद डाळीचे भाव २० ते २५ रुपये किलो मागे वधारले आहे. शनिवारी उडीद डाळीचे भाव ११० ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले.

 

टॅग्स :Akolaअकोला