शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

धान्याचा काळाबाजार केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:46 IST

अकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देदुकानांत आजपासून पोहोचणार धान्य अधिकारी-कर्मचारी ठेवणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.शिधापत्रिकाधारकांच्या वाट्याचे ४0 ते ५0 टक्के धान्य गोदामपाल, दुकानदार, दलालांची साखळी मध्येच हडप करण्याचे प्रकार यापूर्वी सातत्याने घडले आहेत. त्यातच दुकानदार गावातील लाभार्थींसाठी मिळणार्‍या शंभर टक्के धान्याची उचल न करता ते परस्पर काळाबाजारात नेण्याच्या घटनाही घडल्या. त्यातून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. त्याला आवर घालण्यासाठी शासनाने द्वारपोच धान्य वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार दुसर्‍या टप्प्यात धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्याचे काम उद्या ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर धान्याची उचल शासकीय गोदामातून करावी लागायची. द्वारपोच उपक्रमात ते बंद झाले आहे. शासकीय गोदाम ते गावातील धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचून देण्याची जबाबदारी वाहतूक कंत्राटदाराची आहे. वाहन गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोजमाप करून दुकानदाराला सोपवले जाणार आहे. त्यासाठी गावातील पंच मंडळींची साक्षही राहणार आहे. त्यामुळे एकदा गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार करणे दुकानदाराला अशक्य होणार आहे. द्वारपोच धान्य वाटपासाठी कालर्मयादाही निश्‍चित झाली आहे. महिन्याच्या ठरलेल्या तारखेपासून दुकानांमध्ये धान्य पोहोचणार आहे. धान्याचे वाहन गावात पोहोचल्याची माहिती तलाठय़ाकडून दवंडीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे गावात ठरावीक तारखेला मिळालेले धान्य शंभर टक्के वाटप करावे लागणार आहे. आधीच्या पद्धतीमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसात मालाची उचल करून तो साठा परस्पर गायब करण्याचेही प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांची जबाबदारीही निश्‍चित केली आहे. 

काळाबाजार झाल्यास प्रत्येकजण जबाबदारपुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी, गोदामपाल, हमाल कंत्राटदार, वाहतूकदार यांनी त्यांची ठरलेली कामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी बजावले आहे. या सर्वांनी आपापली कामे ठरल्याप्रमाणे केलीच पाहिजे, असा दमही त्यांनी भरला आहे. दुकानदारांनी पॉस मशीनद्वारे वाटप करावे, त्यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड घेऊन दुकानात जावे, परिमाणानुसार धान्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

लाभार्थींनी जागृत व्हावे!गावात पोहोचलेल्या धान्याचे शंभर टक्के वाटप होते की नाही, याची पडताळणी ग्रामस्तरीय दक्षता समितीने करावी, तलाठय़ाने त्याकडे विशेष लक्ष द्यावे, दुकानदारांकडून ठरलेल्या परिमाणाएवढे हक्काचे धान्य घ्यावेच, त्याची पावतीही ग्राहकांनी घ्यावी, गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार होणार नाही, ही जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी केले.-