शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असतील तर रुग्णावर होम आयसोलेशनमध्येच उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:31 IST

ति सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांनाच घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लक्षण नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षण असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार घेता येणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. असे असले तरी जिल्ह्यात अद्याप तरी आरोग्य यंत्रणेने या पयार्याचा विचार केला नाही, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळते.राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच अनेक रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवेवर ताण येताना दिसत आहे. त्यामुळे उपचारासंदर्भात आणखी शिथिलता आणून हा बदल करण्यात आला आहे. नवीन शिथिलतेनुसार ज्या रुग्णांचे अहवाल बाधित आहेत; मात्र त्यांच्यात अतिसौम्य किंवा लक्षणेच नसतील अशा रुग्णांना घरीच उपचार घेतले जातील. यामध्येही सौम्य, अति सौम्य लक्षणे, मध्य तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणे असे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील अति सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांनाच घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शक सूचनाही शासनाने सांगितल्या आहेत.शासन निर्णयानुसार उपचार करणाºया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल प्रमाणित केलेले असावे. रुग्णाच्या घरी योग्य सुविधा असाव्या. चोवीस तास काळजी घेणारी व्यक्ती घरी असावी. रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्णालय यांच्यात संपर्क असणे गरजेचे आहे. काळजी घेणारी व्यक्ती व संपर्कातील व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन घ्यावी. रुग्णांनी नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे. रुग्णाने गृह विलगीकरणाबाबत प्रतिज्ञापत्र भरून देणे गरजेचे आहे.जिल्ह्यात सध्या अंमलबजावणी नाहीदरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात होम क्वारंटाइनच्या नियमांबाबत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणाबाबत काटेकोर नियम पाळले जातील का, असा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अद्याप तरी नव्या शिथिलतेची अंमलबजावणी केली नाही. मंगळवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

अशावेळी घ्यावी वैद्यकीय मदतरुग्णामध्ये गंभीर लक्षणे जसे की धाप लागणे, श्वसनास अडथडा, छातीत सतत दुखणे, शुद्ध हरपणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी लक्षणे आढळल्यास रुग्णाने वैद्यकीय मदत घ्यावी, असेही मार्गदर्शनक सूचनांमध्ये सांगितले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला