शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:52 IST

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल तयार केले आहे.

अकोला: मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याचा परिणाम विदर्भ, खान्देश, मराठवाड्याला अधिक झाला आहे. ओल्यापेक्षा कोरड्या दुष्काळाचे सावट सतत या विभागावर असते. विदर्भातील उन्हाळा तर सर्वश्रुत आहे. कमाल तापमान आताच ४०.५ अशांवर पोहोचले असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल तयार केले आहे. कृषी विद्यापीठाला यासाठीचा आंतरराष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे. कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव वर्षात हे आदर्श मॉडेल शेतकऱ्यांच्या शेतावर नेण्याची गरज आहे.भविष्यात अल्प पाण्यात येणाऱ्या पिकांचे वाण शोधणे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. ही धोक्याची घंटा ओळखून विकसित देशांनी जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या वातावरणातील बदलांमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा प्रत्यय पावसाच्या प्रमाणावरूनही दिसून येत आहे. अवेळी, अति, कमी पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. शेती उत्पादनावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत. पावसाचा लहरीपणा बघून विकसित देशांनी प्रतिवर्ष प्रति माणूस आवश्यक भूपृष्ठावर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. या तुलनेत भारतात प्रतिमाणूस केवळ दोनशे ते सव्वा दोनशे घनमीटर प्रतिवर्ष एवढीच पाणी साठवण क्षमता आहे.भारतात घरगुती वापरासह पिण्यासाठी, शेती, उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक आहे. तथापि, ही गरज भागविण्यासाठी भूपृष्ठावर पाण्याची परिणामकारक साठवण केली जात नसल्याने, शेती उद्योग तर सोडाच, पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वदूर पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसते. मागील १५ वर्षांचा इतिहास बघितल्यास येथे पावसाचे दीर्घ वार्षिक खंड पडलेले आहेत. पुढच्या वर्षी चांगला पाऊस होईल, हे सांगणे कठीण आहे, असा निष्कर्ष तज्ज्ञ काढत आहेत.

- डॉ. पंदेकृविने मागील तीन दशकात पाणलोट क्षेत्रात प्रचंड काम करू न निष्कर्ष काढूल मॉडेल तयार केले. पाऊस व्यवस्थापनाचा आदर्श आराखडा तयार केला. याचा अवलंब केला तर गरजेइतके पाणी आपणास हमखास मिळणार.डॉ. सुभाष टाले,माजी संचालक,कृषी पर्यावरण तसेच प्रमुख मृद व जलसंधारण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ