शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा छळ करणा-या पतीस सहा महिने शिक्षा

By admin | Updated: August 6, 2016 01:58 IST

सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा; एक हजार रुपये दंडही न्यायालयाने आरोपीस ठोठावला.

अकोला, दि. ५: सिंधी कॅम्प येथील रहिवासी पत्नीचा शारीरिक आणि मासनिक छळ करून तिला मारहाण करणार्‍या पतीला प्रथम श्रेणी न्यायालयाने शुक्रवारी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंडही न्यायालयाने आरोपीस ठोठावला आहे.पक्की खोली परिसरातील रहिवासी कौशल्या ऊर्फ भारती बलराम बलवानी यांची भारती ही तिसरी पत्नी असून बलराम याच्या पहिल्या आणि दुसर्‍या पत्नीचा मृत्यू झाला. तर तिसरा विवाह कौशल्या हिच्यासोबत १९९८ मध्ये झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली; मात्र काही दिवसातच या दोघांमध्ये वाद सुरू झाले. बलराम बलवानी हा त्याची पत्नी कौशल्य हिला विनाकारण मारहाण करीत असे, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. ३0 सप्टेंबर २0१२ रोजी बलराम बलवानी याने कौशल्याला लाथा-बुक्क्यांनी तसेच फायटरने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाची तक्रार तिने खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी बलराम बलवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ आणि ५0६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर खदान पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोषारोपपत्र प्रथम श्रेणी न्यायालयामध्ये सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहिनी ननवारे यांच्या न्यायालयाने या प्रकरणाचे पाच साक्षीदार तपासले. यामध्ये त्याची पीडित पत्नी कौशल्या आणि मुलीचे बयान महत्त्वाचे ठरले. बलराम बलवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ नुसार समोर आलेल्या ठोस पुराव्याववरून न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली तर १ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एका महिन्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली. यासोबतच कलम ५0६ अन्वये एक महिन्याची शिक्षा न्यायालयाने आरोपीस सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहिले.