शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:41 IST

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथील स्वाती राठोडची पतीने जाळून हत्या केल्यानंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हत्याकांडातील आरोपी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथील स्वाती राठोडची पतीने जाळून हत्या केल्यानंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हत्याकांडातील आरोपी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.बोरमळी येथील रहिवासी स्वाती किसनराव चव्हाण हिचा विवाह याच गावातील रहिवासी किरण गोपाल राठोड याच्यासोबतच २००७ मध्ये झाला होता. त्यानंतर राठोड दाम्पत्याला एक मुलगाही झाला; मात्र त्यानंतर दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाले. या वादातच २१ आॅगस्ट २०११ रोजी किरण राठोड याने पत्नी स्वातीला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. यामध्ये ८८ टक्के जळालेल्या स्वातीचा २७ आॅगस्ट रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी स्वातीचा भाऊ दर्शन चव्हाण यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा सासरा गोपाल रंगराव राठोड, सोनू राठोड, पूजा राठोड, गंगाराम राठोड, शंकर राठोड, गिरीधर राठोड, राजाराम राठोड व तिचा पती किरण राठोड यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८, ३०७ आणि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका अर्नांल्ड यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर तसेच मृतक स्वातीच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे तिचा पती किरण राठोड याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. भाऊ व वडिलांचा साक्षमध्ये बदलया हत्याकांड प्रकरणात स्वातीचा भाऊ दर्शन व वडील या दोघांनी साक्ष देताना बदल केल्याचे तसेच साक्ष देण्यास नकार दिल्याचाही प्रकार घडला. स्वातीचा मुलगा तिच्या सासरीच राहत असल्याने तिचा भाऊ दर्शन व वडिलांनी साक्ष देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

 स्वातीचा मृत्यूपूर्व बयानस्वाती ही ८८ टक्के जळाल्यानंतर तिचे शासकीय यंत्रणेसमोर मृत्यूपूर्व बयान घेण्यात आले होते. यामध्ये तिने तिचा पती किरण राठोड याचे त्याच्याच कुटुंबातील एका म्हिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले होते. या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळेच स्वाती व तिचा पती किरण यांच्यात वाद व्हायचे. याच कारणावरून वाद झाल्यानंतर किरणने स्वातीला बेदम मारहाण केली. यामध्ये स्वाती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर रॉकेल टाकून जाळण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी