शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

युवतीच्या खून प्रकरणात पती-पत्नी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:53 IST

प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले की आणखी दुसऱ्या कारणातून, याचा तपास पोलीस करीत आहेत.

अकोला : डाबकी रोडवरील एका शेतात आढळलेल्या युवतीच्या हत्याकांडात डाबकी रोड पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले की आणखी दुसऱ्या कारणातून, याचा तपास पोलीस करीत आहेत.६ आॅक्टोबर २०१९ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गजानन नगर येथील रेल्वे लाइनला लागून असलेल्या गुरुखुद्दे यांच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते; मात्र पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरून महिलेचे बानू ऊर्फ नेहा राजू यादव रा. जहागीर गिरी, दिल्ली असे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून नासिर खान अजिज खान (वय ५२) व समिनाबी नासिर खान रा. जरीमरी साकीनाका, मुंबई यांना अटक केली. या दोघांनी संगनमताने बानूचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.हत्याकांडाचे दिल्ली ते मुंबई कनेक्शनसदर युवती हे दिल्ली येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, तर तिची हत्या करणारा दाम्पत्य हे मुंबईतील असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे, या हत्याकांडाचे थेट दिल्ली ते मुंबई कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात समोर येत असून, एक मोठे रॅकेट यामध्ये सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी