शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

कोरोनामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 11:38 IST

. हिंगणा रोडवरील एक महिला आणि तिची पाच मुले दोन दिवसांपासून उपाशी होती.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: कोरोना विषाणू जगभर थैमान घालत आहे. संचारबंदी लागू केली असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. हिंगणा रोडवरील एक महिला आणि तिची पाच मुले दोन दिवसांपासून उपाशी होती. याबाबतची माहिती शेजाऱ्यांनी बालकल्याण समितीला दिली. समिती सदस्यांनी आता या कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची सोय लावून दिली आहे.शुक्रवारी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांना एका महिलेने फोन करून हिंगणा रोडवरील खडकी भागातील एक कुटुंब दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांनी समिती सदस्यांना घेऊन या भागाची पाहणी केली असता, एक महिला तिचे पाच मुले उपाशी असल्याचे आढळले. दोन-तीन दिवस शेजाऱ्यांनी या कुटुंबाला जेवण दिले; मात्र रोज शक्य नसल्याने शेजाºयांनीदेखील पाठ फिरविली. ही महिला कामगार असून, रोजंदारीने कामावर जाते. भाड्याच्या खोलीत राहते. सोबत छोटी पाच मुले. एवढ्यांचा सांभाळ एकटी करीत असल्याची माहिती तिने समितीला दिली. पल्लवी कुळकर्णी यांच्यासेबत सदस्य अ‍ॅड. सुनीता कपिले, प्रीती वाघमारे, नीलेश पेशवे, बाल संरक्षक कक्षेचे सुनील लडोलकार यांनी महिलेची संपूर्ण विचारपूस केली. खदान पोलीस स्टेशनला माहिती दिली. नगरसेवक यांना बोलावून कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याबद्दल सांगितले. काल शुक्रवारी आणि आज शनिवारी बालकल्याण समिती सदस्यांनीच या कुटुंबाची जेवणाची सोय केली. नगरसेवक गणेश पावसाळे, बालकल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, सदस्य अ‍ॅड. सुनीता कपिले यांनी शनिवारी सायंकाळी या महिलेला अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू नेऊन दिल्या.गरिबाले कोरोना होत नाही!समिती सदस्य जेव्हा या कुटुंबाला शोधत फिरत होते, तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार हेच ते कुटुंब असल्याचे निदर्शनास आले. बाई बाहेर बसली होती. मुले बाहेरच खेळत होती. त्यातील दोन रस्त्यांवरच लोळत होती. हे दृश्य पाहून समितीने त्या बाईला घरातच राहा, मुलांना सांभाळ, असे समजून सांगितले; मात्र या महिलेने कोरोना गरिबायले होत नसते, असे म्हटले.नगरसेवकांनी घ्यावी काळजीआपल्या प्रभागातील गरीब व गरजू नागरिकांची काळजी नगरसेवकांनी घेणे आवश्यक आहे. कोरोना संदर्भातील माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य नगरसेवकांचे आहे,असे या प्रकारावरून अधोरेखित होते.पाच मुलांची करणार सोयमहिलेच्या विनंतीवरून तिच्या पाचही मुलांची निवास व भोजनाची व्यवस्था बालकल्याण समितीमार्फत केली जाणार आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर या मुलांना शैक्षणिक सुविधादेखील पुरविण्यात येणार येईल.- अ‍ॅड. सुनीता कपिले, सदस्य, बालकल्याण समितीअकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस