शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लंघापूरच्या आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 18:46 IST

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मूर्तिजापूर(अकोला) : उमा बॅरेज प्रकल्पात गेलेल्या लंघापूर या गावाच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन दिले; मात्र या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी मूर्तिजापूर तहसीलसमोर २७ जून रोजी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसºया दिवशी आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.उमा बॅरेज प्रकल्पामध्ये जात असलेल्या लंघापूर गावाच्या पुनर्वसनाचे काम २००९ पासून म्हणजे १० वर्षांपासून प्रलंबित आहे. गावाचे पुनर्वसन होणार असल्याने ग्रामस्थांनी १० वर्षांपासून घरांची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची घरे शिकस्त झाली असून, अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये  आहेत. यंदाच्या पावसाळ्यात अनेक घरे पडण्याच्या स्थितीत असून, त्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तसेच ५-५ वर्षांपासून गावाची विकासाची कामे पूर्णपणे बंद आहेत, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात बाबाराव पाटील पाचडे, श्याम पाचडे, अशोक पाचडे, सिद्धार्थ सदाशिव, सरदार शा, बुरान शा, याकुब शा, रंगराव खराते, रूपाली पाचडे, भीमराव पाचडे, शरद वानखडे, किसन शेळके, लीला खराते, सुनीता मेश्राम, गोकर्णाबाई वानखडे, सुशीला पवार, राधा आमटे, उर्मिला वाघमारे, सुमनबाई गावंडे, इंदुबाई गावंडे, कासम शा, धुर्पता माहोरे, गफ्फार शा, महादेव वानखडे आदींनी सहभाग घेतला आहे. शनिवारी उपोषणकर्त्यांपैकी  अजाब गायकवाड , गोवर्धन  गायकवाड, सुनीता मेश्राम, इंदुबाई  गवई, उर्मिला  वाघमारे , शोभा मोरे , मैना वरघट , सुमन गावंडे यांची  प्रकृती  खालावली.  त्यांना तातडीने  उपजिल्हा  रुग्णालयात  उपचारासाठी  दाखल  करण्यात आले. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)     

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर