शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय कर न भरणा-यांच्या यादीत अकोल्यातील शेकडो वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 02:50 IST

शेकडो वकिलांकडून लक्षावधी रुपयांचा कर वसूल करण्यासाठी व्यवसाय कर अधिका-यांचा प्रयोगांना अद्याप यश आले नाही.

अकोला, दि. २६- व्यवसाय कर न भरणार्‍यांच्या प्रतीक्षा यादीत अकोल्यातील जवळपास आठशे वकिलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला बार असोसिएशनचे सदस्य असलेल्या शेकडो वकिलांकडून लक्षावधी रुपयांचा कर वसूल करण्यासाठी आता व्यवसाय कर अधिकारी विविध प्रयोग करीत असले तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही.सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर पेचातून सोडविण्यासाठी वकील तरबेज असतात; मात्र व्यवसाय कर भरणाच्या पेचात अकोल्यातील शेकडो वकिलच सापडले आहे. अकोला बार असोसिएशनचे सदस्य असलेले जवळपास अकराशे वकील कार्यरत आहे. लेबर कोर्ट, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, दिवानी आणि फौजदारी, सहकार न्यायालय आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या शेकडो वकिलांपैकी केवळ तीनशे वकिलांची नोंद व्यवसाय कर विभागात आहे. उर्वरित अनोंदित वकिलांची नोंद करण्यासाठी विक्री कर विभागाकडून अनेक वर्षांंंपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. व्यवसाय कर भरण्याबाबत विक्री कर विभागाने अनेकदा अकोला बार असोसिएशनच्या सहकार्याने कार्यशाळा घेतली. समुपदेशन वर्ग घेतलेत. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ज्ञ याप्रकरणी अपीलमध्ये गेले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाचे कर भरण्याचे आदेश कायम ठेवल्याने आता वकिलांसमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता वकिलांनी व्यवसाय कराचा भरणा न केल्यास त्यांना व्यवसाय कर अधिकारी सर्वसामान्यांना जशा नोटीस पाठवितात, तशा नोटीस पाठवितात काय, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.अकोला बार असोसिएशनच्या शेकडो वकिलांनी सप्टेंबर अखेरपर्यंंंत असलेल्या अभय योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. मागील तीन वर्षांंंंची नोंद करून कर भरणाची प्रक्रिया नियमित करणे शक्य आहे. याबाबत अनेकदा अकोला बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. बार असोसिएशनच्या कार्यालयात ऑनलाइन यंत्रणा उभारणे अशक्य आहे.- शीतल राजुरकर, व्यवसाय कर अधिकारी, अकोला.ऑनलाइन व्यवसाय कर भरणाची प्रक्रिया किचकट असून त्याचा भरणा करणे सदस्यांना जमलेले नाही. अकोला बार असोसिएशनने व्यवसाय कर भरणासाठी एका न्यायालय परिसरात कर भरणाची व्यवस्था करण्याची मागणी वारंवार केली आहे. त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. बार असोसिएशनच्या बैठकांतूनदेखील याबाबत वारंवार सांगितले गेले आहे. यातून मार्ग काढला पाहिजे.- अँड. श्याम खोटरे, अध्यक्ष, अकोला बार असोसिएशन