शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शेकडो उद्योग धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:43 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.

ठळक मुद्देपाणी-बाणी एमआयडीसीसाठी चार विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तीन महिनेच पुरेल कुंभारीचे पाणी!गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोग

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने  पाण्याची भीषण समस्या उग्र रूप धारण करीत आहे.  पावसाअभावी अकोल्यातील सर्वच जलसाठे कोरडेच  आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत आता  उद्योगांनाही झळ सोसावी लागत आहे. औद्योगिक  वसाहतीमधील रासायनिक उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणा त पाण्याची आवश्यकता असते. अकोल्यात लेबेन,  टाटा रॅलीजसारख्या काही उद्योगांना पाण्याची नितांत  आवश्यकता असते. पाण्याचा पुरेसा साठा न  मिळाल्यास असे उद्योग बंद पडण्याची शक्यता असते.  उन्हाळ्य़ात जाणवेल अशी स्थिती अकोल्यात  पावसाळ्य़ातच निर्माण झाल्याने एमआयडीसी प्रशासन  चिंतातुर झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील ८९0  उद्योगांना कधीकाळी कुंभारी तलावातूनच पाणी  मिळायचे. मात्र, उद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या खांबोरा  प्रकल्पातून एप्रिलपासून पाणी दिले गेले. पावसाने दडी  मारल्याने, पाणी समस्या गंभीर झाली. त्यामुळे पिण्याचे  पाणी राखून ठेवण्याच्या दृष्टीने ३१ ऑगस्टपासून  खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला.  त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने पुन्हा कुंभारी तलावा तून पाणी घेण्यास सुरुवात केली. मात्र, नोव्हेंबर १७  पर्यंंत पुरेल एवढाच जलसाठा या तलावात शिल्लक  आहे. नोव्हेंबरनंतर अकोल्यातील उद्योगांना जिवंत  ठेवणे कठीण झाले आहे. दोन दिवसाआधी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतलेल्या  आढावा बैठकीत या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.  अकोल्यातील उद्योगांना जिवंत ठेवण्यासाठी आता  काय नवी शक्कल लढविता येते, याकडे सर्वांंचे लक्ष  लागून आहे. जर पुरेशा पाण्याचा साठा उद्योजकांना  पुरविला गेला नाही, तर अकोल्यातील शेकडो उद्योग- कारखान्याला ताळे लागण्याची वेळ येऊ शकते. त्याचा  प्रभाव अकोल्यातील इतर जोडधंदे आणि  जनमाणसावरही होण्याची शक्यता आहे. जिल्हा  प्रशासनावर याआधी पावसाळ्य़ात पाण्याचे नियोजन  करण्याची वेळ कधी आली नाही. त्यामुळे यासाठी  भविष्यात आपत्कालीन बैठक बोलाविली जाण्याची  वेळही नाकारता येत नाही. अकोलेकरांची तहान   आणि उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासन  ही पाणी समस्या कशी सोडविते, याकडे सर्वाचे लक्ष  लागून आहे.

गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोगएमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी गिट्टी  खदानीमध्ये पाणी साचले आहे. अनेक दिवसांचे  साचलेले पाणी पिण्यायोग्य नसले, तरी बांधकाम आणि  इतर कामासाठी त्याचा उपयोग शक्य आहे. टँकरने हे  पाणी मिळविल्या जाऊ शकते. सोबतच एमआयडीसी तील हायड्रंट आणि इतर खासगी स्रोतावरही लक्ष केंद्रित  करण्याच्या दिशेनेही विचार सुरू आहे.

औद्योगिक वसाहत परिसरात भरपूर पाणी असलेल्या  चार विहिरी आहेत. यापैकी एक विहीर एमआयडीसीची  असून, इतर विहिरी खासगी आहेत. या चारही विहिरींचे  अधिग्रहण करून अकोल्यातील उद्योगांना जीवनदान  देण्याचा प्रयत्न आमचा आहे. उन्हाळ्य़ातही  उद्भवणार नाही, अशी स्थिती यंदा आहे. यासाठी  जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार  केला जातो आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी,  अकोला.-