लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील रचना कॉलनीमध्ये घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रचना कॉलनीत राहणारे सुरेश लक्ष्मणराव बाविस्कर (५७) यांच्या तक्रारीनुसार ते कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील शयनकक्षात असलेल्या कपाटातील दोन तोळ्याच्या सोन्याचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमची अंगठी, चांदीचे दोन ताट, सोन्याचे चार तोळे असे एकूण १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सुरेश बाविस्कर रविवारी घरी आल्यावर त्यांना घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडलेले दिसून आले. घरात गेल्यावर त्यांना साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी, खदान पोलीस ठाण्यात दुपारी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.
दीड लाखांची घरफोडी
By admin | Updated: June 26, 2017 09:37 IST