शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील राष्ट्रीय अधिवेशनात शेकडो लेखापाल विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:13 IST

देशभरातून आलेल्या जवळपास साडेचारशे लेखापाल विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लेखापाल विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन सामान्य असू शकत नाही, असे प्रतिपादन बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष दुर्गेश काबरा यांनी केले. इन्सिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया, अकोला आणि वेस्टर्न इंडिया सिटी स्टुडंट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सनदी लेखापाल विद्यार्थ्यांचे द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात थाटात झाले. देशभरातून आलेल्या जवळपास साडेचारशे लेखापाल विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास हजेरी लावली.दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष दुर्गेश काबरा उद्घाटक म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यूआयआरसीच्या प्रीती सावला, डब्ल्यूआयसीएसचे जयेश काला, स्थानीय शाखेचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, उपाध्यक्ष जलज बाहेती, सी.व्ही. चितळे, आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिल सदस्य दिल्ली येथील राजेश शर्मा, डब्ल्यूआयसीएएसएचे उपाध्यक्ष हर्ष नावंदर, सचिव दीपक शर्मा, मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील तज्ज्ञ सीए आणि अर्थविषयक गाढे अभ्यासक अकोल्यात दाखल झाले आहेत.दोन दिवस चालणाºया अधिवेशनात नागपूरचे अभिजित केळकर, वडोदराचे विशाल जोशी, मुंबईचे अर्पित काबरा, ठाण्याचे मंगेश किनारे, नागपूरचे कमलकिशोर राठी, औरंगाबादचे उमेश शर्मा, मुंबईचे प्रणय कोचर, पुण्याच्या अंकिता बोरा, आनंद जाखोटिया विशेष व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करीत आहे. त्यानिमित्ताने या अधिवेशनात १५ विद्यार्थी विविध राष्ट्रीय विषयांवर पेपर सादर करीत आहे. कंपनी कायदे, जीएसटी, आयकर, माहिती तंत्रज्ञान व आॅडिटिंग या विषयावर तांत्रिक सत्र लेखापाल विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरत आहे.राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सनदी लेखापालचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाchartered accountantसीए