शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

माळीपुऱ्यातील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या माळीपुरा परिसरातील महेश हार्डवेअर या दुकानाला मंगळवारी पहाटे भीषण आग ...

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या माळीपुरा परिसरातील महेश हार्डवेअर या दुकानाला मंगळवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंब पाण्याद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.

माळीपुरा परिसरात असलेल्या यकीन हॉस्पिटलच्या समोर महेश हार्डवेअर नावाचे मोठे दुकान आहे. या दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे महेश हार्डवेअर संचालकांचे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दोन बंब पाण्याद्वारे ही आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. पोलीस व महसूल प्रशासनाने पंचनामा केला असून नुकसान किती झाले याची आकडेवारी घेण्यात येत आहे.

समोरील हॉस्पिटलला झळ नाही

महेश हार्डवेअर या दुकानासमोरच यकीन हॉस्पिटल आहे. या आगीमुळे हॉस्पिटलला झळ पोहोचण्याची चर्चा होती; मात्र तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे हॉस्पिटलच्या कोणालाही झळ पोहोचली नाही.