शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

हावडा-अमृतसर रेल्वेत लुटमार; दोघांना अटक

By admin | Updated: September 24, 2015 01:24 IST

रेल्वे सुरक्षा बलामुळे मोठी लुटमार टळली.

मलकापूर/शेगाव (जि. बुलडाणा) : हावडा- अमृतसर रेल्वेमध्ये सीआरपीएफचे जवान व स्टाफ असल्याची बतावणी करीत अपंगांच्या राखीव बोगीत घुसून दोघांनी लूटमार केल्याची घटना २३ सप्टेंबरला पहाटे मलकापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या हद्दीत घडली. रेल्वे सुरक्षा बलाने या प्रकरणी गुजरातमधील कच्छ भागातील पुलमा येथील शे. रहीम शे. मोहम्मद आणि अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ भिलापूर येथील अरविंद पंडितराव बाठे या दोघांना रेल्वे पोलिस दलाच्या ताब्यात दिले आहे. हे दोघे हावडा-अमृतसर रेल्वे क्रमांक १२८३४ मधील जनरल बोगीतून प्रवास करीत असताना मलकापूर रेल्वेस्थानकावर अपंगांच्या बोगीत चढले. रेल्वे सुरू होताच त्यांनी बोगीतील अपंगांना मारहाण करून लुटमार सुरु केली व त्यांच्याकडील पैसे लुटले. हा प्रकार प्रवाशांनी रेल्वे गाडीतील स्कॉटिंग स्टाफला सांगितल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.हरणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्मा, आरक्षक रंजन तेलंग, संजय कायंदे, शंकर घाटोळे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत भुसावळ रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस दलाच्या (राज्य शासन) ताब्यात देण्याचा प्रयत्न केला; मात्र घटना मलकापूर हद्दीत घडलेली असल्यामुळे त्यांनी या आरोपींना ताब्यात घेतले नाही. परिणामी रेल्वे सुरक्षा बलाच्या पाचही अधिकारी व कर्मचार्‍यांनी लुटमार करणारे दोघे व पीडित नऊ जणांना शेगाव रेल्वे पोलीस दलाच्या ताब्यात दिले. शेगाव रेल्वे पोलीस दलाने दोन्ही आरोपींविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ करुन जबर मारहाण करणे तथा जिवे मरण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे रेल्वे पोलीस अँक्ट १८९0 च्या कलम १२८ व १२९ नुसारही या दोन्ही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. हावडा-अमृतसर एक्सप्रेसमध्ये २३ सप्टेंबरच्या पहाटे १ ते ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. दुसरीकडे नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळसह लगतच्या भागात रेल्वे सुरक्षा बलाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्या अनुषंगाने सतर्क असलेल्या मलकापूर हद्दीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या या चमूने दोन्ही आरोपींना प्रसंगावधान राखून ताब्यात घेतल्यामुळे मोठा दरोडा तसेच लुटमार थोडक्यात वाचली, असे प्रवाशांमधून बोलले जात आहे. घटनेतील दोन्ही आरोपींना अपंगांच्या बोगीतून अवघे १६00 रुपये मिळाले असले तरी त्यांना केलेला प्रकार गंभीर होता. या घटनेने गांभीर्य वाढले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.