शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 10:10 IST

यंदा कोविडची साथ असूनही गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा मृत्यूदर कमीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ वर पोहोचल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतकांना कोरोनाव्यतिरिक्त गंभीर अनियंत्रित जुनाट आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाणही ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे सर्वौपचार मध्ये गतवर्षी झालेल्या मृत्यूच्या आकड्यांची तुलना केल्यास यंदा कोविडची साथ असूनही गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा मृत्यूदर कमीच आहे.जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दररोज मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अकोलेकरांचे लक्ष मृत्यूच्या संख्येकडे वेधले असून, अनेकांच्या मनात धडकी भरली आहे; मात्र गत वर्षी जानेवारी ते जून महिन्यातील मृत्यूच्या आकड्यांशी तुलना केल्यास यावर्षी गत सहा महिन्यात सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमीच आहे. कोरोनाने एप्रिल महिन्यात जिल्ह्यात शिरकाव केला असून, या महिन्यात कोरोनाचे चार बळी, तर मे महिन्यात २८ बळी गेले. तर जून महिन्यात गत १९ दिवसांत २७ बळी गेले आहेत. तर जानेवारी २०२० ते जून २०२० पर्यंत ८७० जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत कोरोना नसतानाही गतवर्षी १ हजार १०३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभिलेखा विभागाकडून ही आकडेवारी मिळाली असून त्यानुसार, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी मृत्यूचा दर मागील वर्षीच्या तुलनेत कमीच आहे.

गतवर्षी एप्रिल-मे महिन्यात ३८१ जणांचा मृत्यूकोरोनामुळे दररोज मृतकांचा आकडा वाढत असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे वेधले आहे; परंतु गतवर्षी एप्रिल-मे महिन्यातील मृत्यूदर हा ३३ ने जास्त होता. गत वर्षी या दोन महिन्यात ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर यंदा ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा निरंतर प्रयत्नशील आहे. मृतकांमध्ये कोरोनाव्यतिरिक्त इतरही गंभीर आजार होते. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना असूनही मृत्यूदर कमी आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या