शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती?

By admin | Updated: September 6, 2016 02:28 IST

गॅस सबसिडीमध्ये महिन्याकाठी होतो बदल; त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

अकोला, दि. ५ : गॅस सिलिंडरधारकांच्या थेट बँक खात्यात सबसिडी रक्कम जमा केली जाते; मात्र प्रत्येक महिन्यात सिलिंडरचे दर बदलत असल्याने, सबसिडीच्या रकमेतही बदल होतो. त्यामुळे गॅस सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती, याबाबत गॅस सिलिंडर ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.केंद्र शासनाच्या निर्णयानुसार गॅस सिलिंडर सबसिडीची रक्कम थेट गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. गॅस सिलिंडर वितरकांकडे सिलिंडरच्या मूळ रकमेचा भरणा केल्यानंतर सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते; परंतु केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयामार्फत गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात बदलतात. गॅस सिलिंडरच्या दरातील कमी-जास्त रकमेच्या बदलानुसार गॅस सिलिंडरधारकांना दिल्या जाणार्‍या सबसिडीच्या रकमेतही बदल होतो. त्यामुळे एका महिन्यात सिलिंडर सबसिडीची ग्राहकांच्या बँक खात्यात जेवढी जमा होते, तेवढीच सबसिडीची रक्कम दुसर्‍या महिन्यात बँक खात्यात जमा होत नाही. गॅस सिलिंडर सबसिडी रक्कम बँक खात्यात जमा होण्याचे निश्‍चित नाही. महिन्याकाठी गॅस सिलिंडरच्या दरात होणारे बदल आणि त्यानुसार सबसिडी रकमेत बदल होत असल्याने, सिलिंडरची सबसिडी आहे तरी किती, याबाबत गॅस सिलिंडर ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हय़ात ४८ रुपये सबसिडी!केंद्र शासनामार्फत निश्‍चित करण्यात आलेल्या दरानुसार सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्हय़ातील गॅस सिलिंडरधारकांना ५0८ रुपये ५0 पैसे देऊन सिलिंडर घ्यावे लागत आहे. वितरकांकडे रकमेचा भरणा केल्यानंतर सिलिंडरची ४८ रुपये २३ पैसे इतकी रक्कम गॅस सिलिंडरधारकांच्या बँक खात्यात जमा होत आहे. गत ऑगस्ट महिन्यात प्रती सिलिंडरचे दर ५३१ रुपये होते. त्यापैकी ७४ रुपये प्रमाणे सबसिडीची रक्कम गॅस सिलिंडरधारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.