शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोटवाणी-आहुजांकडे शेकडो कोटी आले कुठून? चर्चांना उधाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:17 IST

अकोला : बारा-पंधरा वर्षाआधी अकोला बाजारपेठेत एक -एक दुकान घेऊन बसणारे मोटवाणी आणि आहुजा आज शेकडो कोटींचे मालक झाले आहेत. दुकानदारापासून उद्योजकापर्यंत पोहोचणार्‍या या परिवाराची लॉटरी लागली तरी कोठे? असा प्रश्न शहरातील इतर व्यापार्‍यांसाठी संशोधनाचा विषय ठरतो आहे. बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आहुजा आणि मोटवाणी या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला त्यानंतर आता मोटवाणी-आहुजा यांच्या श्रीमंतीचे किस्से बाजारात चर्चेचा विषय झाले आहेत.

ठळक मुद्दे२१ प्रतिष्ठानांची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी! 

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बारा-पंधरा वर्षाआधी अकोला बाजारपेठेत एक -एक दुकान घेऊन बसणारे मोटवाणी आणि आहुजा आज शेकडो कोटींचे मालक झाले आहेत. दुकानदारापासून उद्योजकापर्यंत पोहोचणार्‍या या परिवाराची लॉटरी लागली तरी कोठे? असा प्रश्न शहरातील इतर व्यापार्‍यांसाठी संशोधनाचा विषय ठरतो आहे. बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आहुजा आणि मोटवाणी  या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला त्यानंतर आता मोटवाणी -आहुजा यांच्या श्रीमंतीचे किस्से बाजारात चर्चेचा विषय झाले आहेत.सिंधी कॅम्पच्या कच्ची खोलीत राहणारे नंदू मोटवाणी आणि त्यांच्या तीन सख्या भांवडांच्या परिवाराचा मोठा विस्तार झाला आहे. पंधरा वर्षाआधी या परिवाराचे टिळक मार्गावर अकोला पाइप फिटिंग आणि दगडी पुलाजवळ सिंध हार्डवेअरचे  दुकान होते, ते आजही आहे. त्यानंतर मोटवाणी यांनी योगेश स्टिलसह रिधोरा येथे पाइपची फॅक्टरी टाकण्यापर्यंत मजल गाठली. चायना कंपनीच्या मोबाईल विक्री ठोक ने करणारे व्यापारी आणि सिगारेटीचे उद्योजक म्हणून नंतर हा परिवार मे. हकीकतराय अँन्ड सन्स म्हणून नावारूपास आला. अल्पावधीतच मोटवाणी परिवार शेकडो कोटींचे मालक झाले. अकोला महापालिका निवडणुकीच्या वेळी परिवारातील सदस्य अनिल कन्हैया मोटवाणी याला भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत एक लॉबी पोहोचली होती. सोबतच नव्याने उभारण्यात येत असलेल्या न्यू किराणा बाजाराजवळील व्यापारी संकुलात मोटवाणी परिवाराने २0 गाळे आधीच बुक केले आहेत. अकोला आणि शहराबाहेर या परिवाराची मोठी बेनामी मालमत्ता असल्याचीही चर्चा सर्च ऑपरेशन नंतर बाजारपेठेत आहे. काही महिन्याआधी या परिवाराने एक कोटींची र्मसडीज कंपनीची कार विकत घेतली आहे. मोटवाणी परिवाराच्या कीर्तीप्रमाणे आहुजा परिवाराची देखील कीर्ती अशीच आहे. रयत हवेलीजवळच्या पिंपळेश्‍वर मंदिराजवळ या परिवाराचे एक लहानशे दुकान होते. किराणा व्यापाराच्या भरवशावर या परिवाराने दयाराम अँन्ड सन्स आणि धनराज ट्रेडर्स प्रतिष्ठान उभारले. पंधरा वर्षांच्या आत या परिवाराने दयाराम इंडस्ट्रिजपर्यंत झेप घेतली. देशातील अत्याधुनिक मशनरी असलेली दालमिल आहुजा परिवाराकडे आहे. सोबतच बायपास मार्गावरील न्यू किराणा बाजारात कोट्यवधीचे तीन गाळे या परिवाराने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.अल्पावधीत शेकडो कोटींचे मालक झालेल्या मोटवाणी-आहुजा यांनी असा कोणता व्यवसाय केला, की पंधरा वर्षांत त्यांच्या अनेक फर्मचा विस्तार झाला. हा विषय आता अकोल्यातील व्यापार्‍यांसाठी संशोधनाचा ठरतो आहे. दोन्ही परिवाराच्या अनेक नातेवाईकांच्या नावानेदेखील बेनामी मालमत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आहुजा आणि मोटवाणी या  उद्योजकांच्या प्रतिष्ठानावर प्राप्तिकर विभागाने सुर केलेला सर्च गुरूवारीही सुरू राहणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर