- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. या धरणाच्या वर छोटे-मोठे १२ प्रकल्प आहेत. हे प्रकल्पच कोरडे असल्याने काटेपूर्णा धरण पाण्याने भरणार कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. काटेपूर्णा धरणात गुरुवार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ३.६८ टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध होता. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात २३ जून, २६ जुलै व ७ आॅगस्ट असा तीनच दिवस बऱ्यापैकी पाऊस पडला. काटेपूर्णा धरणाच्या साठ्यात वाढ होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची गरज आहे; परंतु असा पाऊस झालाच नाही. वाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत. काटानंतर पहिलाच सुकांडा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जलाशय पातळी २.३७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानंतरचा कुºहाळ प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पातळी ३.०० दलघमी आहे.
काटेपूर्णा धरणावरील प्रकल्प यावर्षी अद्याप कोेरडेच आहेत. हे प्रकल्प पाण्याने भरल्यानंतरच काटेपूर्णा धरणात जलसंचय होईल. पाऊस येईल, अशी अपेक्षा असून, धरणात जलसाठा उपलब्ध होईल. आता जे पाणी उपलब्ध आहे, त्याचे मात्र काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे.-चिन्मय वाकोडे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.