शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

बेताल वाहतुकीला शिस्त लावायची कुणी?

By admin | Updated: July 5, 2017 01:22 IST

सुविधाही हव्यात : पोलीस कारवाईचा प्रभाव तात्कालिक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील बेताल वाहतुकीमुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहनांची भरमसाट गर्दी वाढत असल्याने, वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बेताल वाहतुकीला शिस्त लावायची कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस वाहनचालकांवर कारवाई करतात; परंतु पोलिसांच्या कारवाईचा प्रभाव तात्कालिक असल्याने, पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलणे, ट्रिपलसिट वाहन चालविणे, सिग्नल तोडून भरधाव जाणे; वाहतूक नियमांचे नेहमीच होणारे अशा प्रकारचे उल्लंघन नित्याचे झाले आहे. नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवावर बेतते. भरचौकात उभे राहणारे आॅटोरिक्षा, रस्त्यांवरील उभी केलेली वाहने, वाढते अतिक्रमण, तसेच फेरीवाल्यांमुळेही वाहतुकीची कोंडी होत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा उदासीन आहे. वाहतूक पोलीस कारवाई करतात; परंतु त्याचा वाहनचालकांवर प्रभावी परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करून वाहनचालकांवर कडक कारवाई करून वठणीवर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृतीसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते; मात्र या अभियानाचा फायदा होत नाही.वाहतूक नियमांचे पालन करणे हे आपल्याच सुरक्षेसाठी आवश्यक आहे, ही जाणीव वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये होणे आवश्यक आहे.दुचाकी पार्किंगची सुविधाच नाहीशहरात पुरेसे वाहनतळ नसल्यामुळेच शहराच्या वाहतुकीची कोंडी होत आहे़ महापालिकेने काही वर्षांपासून वाहनतळ कंत्राट पद्धतीने देणे सुरू केले होते. या वाहनतळांचे कंत्राट निविदा बोलावून दिले जाते; परंतु काही वर्षांमध्ये वाहनतळ नावापुरतेच उरले आहेत़ दोन ते तीन वाहनतळ असूनही कोणी वाहनतळावर वाहने ठेवतच नाहीत़ नागरिकांनादेखील वाहनतळांची सवय नसल्यामुळे वाटेल तिथे वाहने उभी केली जातात आणि त्याचा त्रास रहदारी करणाऱ्यांना होतो़जड वाहनांचे अनधिकृत ‘पार्किंग झोन’शहरात नियमबाह्यपणे जड वाहने प्रवेश करतात. ट्रक कुठेही रस्त्यांवर उभे करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. फतेह चौक ते दामले चौक, बाळापूर रोड-भांडपुरा, अकोट स्टँड, रेल्वेस्थानक परिसरासत ट्रक मोठ्या प्रमाणात उभे असतात. जड वाहने उभी करण्यासाठी एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध (ट्रान्सपोर्टनगर) करून देण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी कोणीच जड वाहने उभी राहत नाहीत. जड वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्याची गरज आहे. जीव महत्त्वाचा की वेळ? सिग्नल तोडून चौकातून भरधाव जाणे, ही तर फॅशनच झाली आहे. सिग्नल तोडून वाहन दामटण्याचे प्रमाण युवक, युवतींमध्ये सर्वाधिक आहे. सिग्नलवर काही मिनिटे थांबण्यास वाहनचालकांजवळ वेळ नसतो. सिग्नलवरील वेळ पूर्ण होण्याच्या आधीच सुसाट वाहने पळविली जातात. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी जीव महत्त्वाचा की वेळ, हे ठरवावे. ट्रिपलसिट वाहन चालविणे आमचा हक्कचट्रिपलसिट वाहन चालविण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या डोळ्यांदेखत अनेक जण ट्रिपलसिट दुचाकी दामटतात. तरीही पोलीस कारवाईकडे कानाडोळा करतात. पोलिसांनी अडविले तर कोणत्या राजकीय नेत्याला, पोलीस अधिकाऱ्याची ओळख सांगून, फोन करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जातो. वाहतूक पोलीसही उगाच वाद नको म्हणून ट्रिपलसिट वाहन चालविणाऱ्यास सोडून देतात. उपाययोजना केल्यास बदल शक्येशहरातील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त झाली आहे, हे रस्त्यांवर वाहन चालविताना कळते. वाहतूक पोलीस दिवस निघाला की त्यांचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यात मग्न असतात. कुणीही, कुठूनही मनात येईल तशा गाड्या घुसवतो. प्रत्येकाच्या मागे विलक्षण ‘मरण’घाई. असते. या बेताल वाहतुकीवर उपाय आहेत; त्यासाठी प्रशासनाला फारसा खर्च येईल, असेही नाही. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूने पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंग झोन, वाहतूक नियमांच्या माहितीचे फलक लावण्याची गरज आहे. आम्ही काम करतो; परंतु आमच्यासमोर काही समस्या आहेत. सिग्नल व्यवस्था नाही. दिशादर्शक फलक, पार्किंगची सुविधा नाही. अनेक रोडचे बांधकाम अपूर्ण आहे. फुटपाथ नाहीत. दररोज अतिक्रमण काढायला हवे. आॅटोरिक्षा स्टॉपसाठी जागा नाही. रस्त्यांवर गुरे-ढोरे फिरतात. मनपाने सहकार्य केल्यास शहराची बेताल वाहतूक ताळ्यावर आणण्यास वेळ लागणार नाही. गत सहा महिन्यांमध्ये वाहनचालकांवर कारवाई करून ७0 लाख रुपयांचा दंड वसूल केला. - विलास पाटील, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा