शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चक्क नदीपात्रात उभारली घरे; पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:17 IST

मोर्णा नदीपात्रात एक-दोन नव्हे, तर असंख्य घरे उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोर्णा नदीपात्रात एक-दोन नव्हे, तर असंख्य घरे उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता अतिक्रमित घरांमधील रहिवाशांना पुराचा धोका निर्माण झाला असून, यासंदर्भात महापालिका तसेच जिल्हा प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मागील दोन वर्षांपासून भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून मलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम केले जात आहे. या कामादरम्यान मलवहिनीच्या बाजूला एलईडी पथदिवे उभारण्यात आले.मलवाहिनीचे जाळे असदगड किल्ल्याच्या पूर्व दिशेला टाकण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित जागेचा गैरफायदा उचलत खिडकीपुरा भागातील स्थानिक रहिवाशांनी चक्क मोर्णा नदीच्या पात्रात अतिक्रमित घरे उभारली आहेत.पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता अतिक्रमित घरांमधील रहिवाशांच्या जीवाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीला मोठा पूर आल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घरे बांधली जात असताना महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच प्रभागाचे नगरसेवक झोपा काढत होते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)नदीकाठावर वीटभट्टीला परवानगी कशी?चक्क नदीपात्रात अतिक्रमित घरे उभारली जात आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय नदीकाठावर उभारण्यात आलेल्या तब्बल चार वीटभट्ट्यांना परवानगी नेमकी कोणाची, असा सवाल नदीकाठालगतच्या रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMorna Riverमोरणा नदी