माना/ जामठी बु. (जि. अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यात बुधवारपाठोपाठ शुक्रवार, १0 एप्रिल रोजीही वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी माना येथे वीज पडल्याने एका घराला भेगा पडल्या. माना येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आकाशात काळेभोर ढग दाटून आले. त्यानंतर विजांच्या कडकडाट होऊन अहमदखाँ रशीदखाँ यांच्या घरावर वीज पडली. त्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. वीज पडल्यामुळे अहमदखाँ यांच्या घराच्या भिंतीला दोन ठिकाणी भेगा पडल्या. तसेच ग्रील तुटली. यावेळी काही मुले बाहेर खेळत होती. त्यांना दगडविटांचा किरकोळ मार बसला. मात्र, कोणतीही जीवित हानी झाली नाही.
माना येथे वीज पडल्याने घराला भेगा
By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST