शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी ’ची सभा वादळी; आमदार-जिल्हाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:34 IST

अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार प्रकाश भारसाकळे व पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया व महापौर विजय अग्रवाल यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही का करण्यात आली नाही, अशी विचारणा आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली.स्ताव मी पाठवू शकत नाही, ‘डीपीसी’ अध्यक्ष व सदस्य पाठवू शकतात, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमदार रणधीर सावरकरजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार प्रकाश भारसाकळे व पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया व महापौर विजय अग्रवाल यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकींनी गुरुवारी ‘डीपीसी’ची सभा वादळी ठरली.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, महानरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.मूर्तिजापूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभार्थींना लाभ देण्यात आला नसताना संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे ‘डीपीसी’च्या मागील सभेत ठरविण्यात आले होते. त्यानुसार मागील सभेच्या अनुपालन अहवालातील मुद्दा क्र.६ मध्ये यासंदर्भात उल्लेख का नाही, तसेच प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही का करण्यात आली नाही, अशी विचारणा आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना सभेत केली. तत्कालीन जिल्हाधिकाºयाविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव मी पाठवू शकत नाही, ‘डीपीसी’ अध्यक्ष व सदस्य पाठवू शकतात, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांच्या या उत्तरावर आ. रणधीर सावरकर संताप व्यक्त करीत असताना, आमदार साहेब ‘लिमिट’मध्ये चर्चा करा, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी म्हणताच आक्रमक पवित्रा घेतलेल्या आ. रणधीर सावरकर यांनी लोकप्रतिनिधींना तुम्ही सांगता का, असा सवाल जिल्हाधिकाºयांना केला. या मुद्द्यावरून आ. सावरकर व जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. ‘डीपीसी स्वतंत्र समिती असून, समितीने तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याविरुद्ध कारवाईचा ठराव घ्यावा, आम्ही तसा प्रस्ताव डीपीसी अध्यक्षांकडे सादर करणार असून, अध्यक्ष संबंधित ठरावाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील, असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलRandhir Savarkarरणधीर सावरकरAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय