शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘हॉटमिक्स प्लान्ट’ची चौकशी पूर्ण; अहवाल ‘एसडीओं’कडे सादर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:18 IST

अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक  परवानगी न घेता, विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकार्‍यांकडे (एसडीओ) सादर करण्यात आला आहे. प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकार्‍यांकडून दंडात्मक कारवाईचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकारवाईचा आदेश लवकरच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक  परवानगी न घेता, विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकार्‍यांकडे (एसडीओ) सादर करण्यात आला आहे. प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकार्‍यांकडून दंडात्मक कारवाईचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे.बोरगाव मंजू येथे ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी  बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची जमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही.  त्यामुळे  विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची सविस्तर चौकशी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्‍यांमार्फत चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या संबंधित कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाईचा आदेश उपविभागीय अधिकार्‍यांकडून लवकरच देण्यात येणार आहे.

अकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार कारवाईचा आदेश लवकरच देण्यात येईल.- संजय खडसे उपविभागीय अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहर