शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार ७ दिवसांत मदत

By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST

विधीमंडळ विशेष; रणजित पाटील यांनी उपस्थित केला मुद्दा; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा

अकोला: जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना ७ दिवसांच्या आत मदत देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. शेतकर्‍यांच्या मदतीबाबतचा मुद्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. गतवर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागांमधील खरिपातील पीक परिस्थिती असमाधानकारक असतानाच मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील हातचे पीक गेल्याने शेतकरी पुरता खसला. गारांमुळे शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. गहू, हरभरा, भुईमूग, कपाशी, फळबागा पिके उद्ध्वस्त झाले. कर्ज काढले, संपूर्ण कुटुंब शेतात राबले, पीक उभे झाले; मात्र गारपिटीने तोंडचा घास पळविला, संसाराचा गाडा कसा ओढू, या विवंचनेत शेतकरी सापडला. महसूल विभागानेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावी, अशी मागणी होऊ लागली होती. **४३ कोटी रुपये केले वितरित गारपिटीचा तडाखा शेतीसह घरांनाही बसला होता. त्यामुळे महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. नुकसानाची अहवालही जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार एकूण ५७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी ४३ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली. मदतीचा प्रश्न आता विधिमंडळात पोहोचल्याने लवकरच शेतकर्‍यांपर्यंत उर्वरित मदत पोहोचणार आहे.