शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल!

By admin | Updated: March 12, 2016 02:35 IST

तेल्हारा तालुका : फसवणूक करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी.

तेल्हारा : वांझोटी केळी रोपे देऊन फसवणूक केल्यानंतर आता कांद्या पिकाच्या सद्यस्थितीवरूनबियाणे बोगस दिल्याचा प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात शेतकर्‍यांच्या माथी बोगस बियाणे मारून त्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. बोगस बियाणे देणार्‍या कंपन्या, व्यापार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने शेतकर्‍यांच्या फसवणुकीचे प्रकार थांबत नसल्याचे दिसून येत आहे. तेल्हारा तालुक्यात यावर्षी बाराशे हेक्टरच्यावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. बेलखेड, दानापूर, माळेगाव, तळेगाव बाजार, आकोली, हिंगणी, हिवरखेड या बागायती क्षेत्रात कांदा लागवडीचे प्रमाण अधिक आहे. या भागातील शेतकर्‍यांनी काही खासगी व्यापार्‍यांकडून कांदा बियाणे खरेदी केले. कांदा पिकाला गोंडे पाहून कांद्यामध्ये पोंगा निर्माण होत आहे. त्यामुळे ऐन काढणीवर येत असलेल्या पिकात आपली फसवणूक होत असल्याचे शेतकर्‍यांचे लक्षात येत आहे. तळेगाव बाजार येथे ५00 एकरावर बोगस बियाणे कांदा लागवड झाली आहे. या आधी बेलखेड येथे केळी रोपे खरेदीमध्येसुद्धा शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे, तशी तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.