‘कोरोना’ची धास्ती; कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाची गती मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:11 PM2020-03-17T14:11:21+5:302020-03-17T14:11:26+5:30

माणीकरणासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर होत असल्याने, कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाची गती मंदावली आहे.

Horror of 'Corona'; Debt account authentication slows down! | ‘कोरोना’ची धास्ती; कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाची गती मंदावली!

‘कोरोना’ची धास्ती; कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाची गती मंदावली!

Next

अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यात कर्जमुक्तीसाठी ठरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध याद्यानुसार कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाचे काम सुरू असताना, कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. प्रमाणीकरणासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर होत असल्याने, कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाची गती मंदावली आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २९ फेबु्रवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध याद्यानुसार गावपातळीवरच शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये बायोमेट्रिक मशीनवर शेतकºयांच्या बोटाचे ठसे घेऊन ओळख पटविणे तसेच शेतकºयांचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादी प्रकारचे प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीचे वातावरण सर्वत्र पसरले असताना आणि कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात बायोमेट्रिक पद्धतीचा वापर होत असल्याने, अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात गत तीन-चार दिवसांच्या कालावधीत कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाची गती मंदावली आहे.

दोन दिवसांत केवळ ६७७ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण!
कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यापैकी १४ मार्चपर्यंत जिल्ह्यात ६८ हजार ३२४ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले. त्यानंतर १६ मार्च रोजी दुपारपर्यंत कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणाचा आकडा ६९ हजारावर पोहोचला. त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांत केवळ ६७७ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले.

कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करताना बायोमेट्रिक मशीनवर शेतकºयांच्या बोटांचे ठसे घेण्यात येतात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करताना शेतकºयांनी हात धुतल्यानंतर बायोमेट्रिक मशीनवर बोटांचे ठसे द्यावे, यासंदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. प्रवीण लोखंडे
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), अकोला.

 

Web Title: Horror of 'Corona'; Debt account authentication slows down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.