शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र इंगळे पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST

----------------------------------- गव्हाचे पीक बहरले! पांढूर्णा : यंदा परिसरात गव्हाची पेरणी कमी झाली असली, तरी सध्या गव्हाचे पीक बहरलेले आहे. ...

-----------------------------------

गव्हाचे पीक बहरले!

पांढूर्णा : यंदा परिसरात गव्हाची पेरणी कमी झाली असली, तरी सध्या गव्हाचे पीक बहरलेले आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिली असून, हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

------------------------------

नांदखेड-व्याळा रस्त्याचे काम संथ गतीने

बाळापूर : नांदखेड-व्याळा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्यावर खडी परसली असल्याने वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

------------------------

तेल्हारा शहरात घाणीचे साम्राज्य

तेल्हारा : शहरात उघड्यावर कचरा फेकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

---------------------

चिखलगाव येथे प्रचाराला वेग

चिखलगाव : निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने गावात प्रचाराला वेग आला आहे. रात्रीच्या सुमारास बैठकांना वेग आला आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

----------------------

दोन बिबट्यांचा मृत्यू; चौकशी थंड बस्त्यात

खेट्री : परिसरात शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालामध्ये निष्पन्न झाले, तरी १५ दिवसांचा कालावधी उलटूनही या प्रकरणामध्ये गूढ कायम आहे. या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात असल्याचे चित्र आहे.

------------------------------

८ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात

वरूर जऊळका : गावात प्रचाराला वेग आला असून, विविध विकासाचे प्रलोभन दाखवून उमेदवार मतदाराचे दारी जात असल्याचे चित्र आहे. वरूर, विटाळी गट ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ असून एकाची निवड अविरोध निश्चित झाल्याने ८ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत.

-------------------------

तंत्रनिकेतन पदविका प्रवेशासाठी मुदतवाढ

मूर्तिजापूर : तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास मुदतवाढ मिळाली असून, इच्छुक विद्यार्थी १५ जानेवारीपर्यंत प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी संस्थेत संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.ए.ए. गुल्हाने यांनी केले आहे.

----------------------------------

दिग्रस-चान्नी रस्त्याची दुरवस्था

दिग्रस बु.: दिग्रस बु.-चान्नी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

----------------------------

हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव

बोरगावमंजू : यंदा मुबलक पाणी असल्याने परिसरात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.

----------------------------

कंचनपूर-हातरूण रस्त्यावर खड्डेच खड्डे

हातरूण : परिसरातील कंचनपूर-हातरूण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.