शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची ‘व्हीसी’द्वारे साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:54 IST

अकोला : पुसद शहरातील पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपींचे दोषारोपपत्र ...

अकोला : पुसद शहरातील पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपींचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी मंजुरी दिलेल्या गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी केली.पुसद शहरात बकरी ईदच्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबर २०१५ रोजी अब्दुल मलिक अब्दुल रजाक व त्याचे साथीदार शोएब खान, अब्दुल मलिक ऊर्फ सलीम ऊर्फ हफीजुर रहेमान या तिघांनी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी सदर तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दहशतवादविरोधी पथकाने सुरू केलेल्या या तपासामध्ये सदर तीन आरोपीपैंकी अब्दुल मलिक अब्दुल रजाक हा दहशतवादी असल्याच्या हालचाली त्याच्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. देशविघातक कृत्य करीत असल्याचेही दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. त्यानंतर या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने गृह मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी यांनी गृह मंत्रालयाची मंजुरी तसेच विधी व न्याय समितीच्या मंजुरीनंतर सदर तीनही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर गुरुवारी याच विषयावर बक्षी यांची दहशतवादविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयात ‘व्हीसी’द्वारे साक्ष घेण्यात आली असता आरोपींचे वकील अ‍ॅड. दिलदार खान यांनी सदरची मंजुरी देण्याचे अधिकार मुख्य सचिवांनाच असल्याने बक्षी यांनी कायद्याचा भंग केल्याचा मुद्दा मांडला, तसेच बक्षी यांच्या साक्षची उलटतपासणी केली. या प्रकरणात शुक्रवारी पुसदच्या शहर पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. दिलदार खान, अ‍ॅड. नजीब शेख व अ‍ॅड. अली रजा यांनी कामकाज पाहिले.पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये धागेदोरेदहशतवादविरोधी पथकाने तपास करीत असताना यामधील मुख्य आरोपी अब्दुल मलिक अब्दुल रजाक याचे पाकिस्तान व अफगाणिस्तान या ठिकाणावर दहशवाद्यांची धागेदोरे असल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय