शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

हॉकी मैदानाचा प्रश्न कायम

By admin | Updated: August 28, 2015 23:42 IST

देशभरात मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी होत असताना अकोल्यातील हॉकीपटू मात्र मैदानापासून वंचित.

अँड. नीलिमा शिंगणे/ अकोला: देशभरात मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी होत असताना अकोल्यातील हॉकीपटू मात्र मैदानापासून वंचित आहेत. यंदाच्या महाराष्ट्र दिनी जिलचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या शासकीय हॉकी मैदानाची स्थिती ह्यजैसे थेह्ण आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाला स्वत:चे हक्काचे मैदान असूनही पोलीस मुख्यालयातील हॉकी मैदानासाठी पोलिस विभागाकडे मदत मागावी लागते. एकेकाळी अकोल्यात हॉकीला वैभवशाली दिवस होते. पूर्वीचे जिल्हा सामान्य रुग्णालय व सध्याचे सवरेपचार रुग्णालय येथे हॉकीचे मैदान होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात हे मैदान गेल्यानंतर अकोल्यातील हॉकीपटूंना सरावासाठी मैदानच राहिले नाही. पोलीस मुख्यालयातील हॉकी मैदानात शालेय स्पर्धांंव्यतिरिक्त अन्य उच्चस्तर हॉकी स्पर्धा घेण्यास बर्‍याचदा अडचणींना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र दिनी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी सरकार दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे एका तपानंतर हॉकीप्रेमींना हक्काचे मैदान मिळवून दिले होते. मात्र, हा केवळ देखावाच ठरला. लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे क्रीडाधोरणानुसार हॉकीचे मैदान सन २000-२00१ मध्येच मंजूर झाले आहे. मैदानदेखील तयार करण्यात आले. परंतु हे मैदान स्पर्धाकरिता तर दूरच सराव करण्याकरिता देखील योग्य नाही. मैदान मिळाले परंतु खेळण्यायोग्य नसल्याने एकही आजी-माजी हॉकीपटू तिकडे फिरकले नाही. जिल्हा हॉकी संघटना व हॉकीप्रेमी नागरिकांकडून हक्काचे मैदान मिळविण्यासाठी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. यासाठी मोर्चे, आंदोलनदेखील केलीत, मात्र, एकदाही प्रशासनाने संघटनेला साद दिली नाही. संघटनेने अनेकदा स्वत:च्या खर्चाने हिरवळीयुक्त मैदान निर्मिती करण्याची प्रशासनाकडे मागणी केली. फक्त योग्य जागा प्रशासनाने द्यावी, अशीही विनंती केली. परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेत. हॉकीमधील एक उच्चकोटीचे नाव कॅप्टन अरविंद कदम ते नव्या पिढीचा प्रतिनिधित्व करणारा धीरज चव्हाण अशी मोठी उज्ज्वल परंपरा अकोल्याला लाभली आहे. क्रीडाप्रेमी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत हॉकी मैदान उपलब्ध करू न देतील काय, असा प्रश्न हॉकीपटू करीत आहेत.