शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

औषधांअभावी एचआयव्हीग्रस्त धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:55 IST

नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत; मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रिया रखडली आहे.

- प्रवीण खेतेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात एचआयव्हीच्या थर्ड लाइन औषधांचा तुटवडा असून, त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांना बसत आहे. राज्यात थर्ड लाइन औषधांसाठी ‘एआरटी’चे केवळ सहा केंद्र असून, या ठिकाणी रुग्णांना सात ते आठ गोळ्याच दिल्या जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत; मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गत दीड महिन्यांपासून सर्वत्र एचआयव्हीच्या थर्ड लाइन औषधांचा तुटवडा आहे.एचआयव्ही रुग्णांसाठी राज्यभरात ‘अ‍ॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) केंद्र सेवा देत आहेत. या ठिकाणी एचआयव्हीच्या रुग्णांना गरजेनुसार फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लाइन औषधे दिली जातात; परंतु गत वर्षभरापासून राज्यात एचआयव्हीच्या या औषधांचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांना दोन महिन्यांऐवजी केवळ दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढीच औषधे दिली जात आहेत. दरम्यान, नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या (नॅको) निर्देशानुसार, एआरटी केंद्रांना स्थानिक स्तरावरच औषध खरेदीबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली; मात्र औषध खरेदीसाठी ई-टेंडरच्या प्रक्रियेला दिरंगाई होत असल्याने एचआयव्हीच्या रुग्णांसाठी अडचणी वाढल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अकोला येथील एआरटी केंद्रावरच थर्ड लाइन औषधांचा पुरवठा केला जातो; मात्र येथील औषध पुरवठाही महिना दीड महिना पुरेल एवढाच शिल्लक असल्याची माहिती एआरटी केंद्राच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.विदर्भासाठी अकोला एकमेव केंद्रविदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी अकोल्यातील एआरटी केंद्र एकमेव केंद्र आहे. विदर्भातील जवळपास १८४ पेक्षा जास्त एचआयव्ही रुग्णांवर थर्ड लाइन औषधांचा उपचार सुरू असल्याची माहिती आहे.तामिळनाडूत एकाचा मृत्यूएचआयव्हीच्या थर्ड लाइन औषधांअभावी तामिळनाडूतील तंबरम (जिल्हा कद्दुलोर) येथील एका रुग्णाचा शनिवार, ११ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अकोल्यातील विहान संस्थेतर्फे माहिती देण्यात आली.एचआयव्ही रुग्णांसाठी थर्ड लाइन औषधे अत्यंत महत्त्वाची असून, ती न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. गत दीड महिन्यांपासून औषधांचा तुटवडा असून, तामिळनाडूत एकाचा मृत्यू झाला आहे. खासगीत ही औषधे उपलब्धच नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका आहे.- गौतम ढाले, सचिव, नेटवर्क आॅफ बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही (विहान), अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHIV-AIDSएड्स