शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:13 IST

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांसह इतर महिला कर्मचाऱ्यांना ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण दिले.

अकोला : ‘नशिबाने मिळाला आपणास आरोग्य सेवेचा मान, जनजागृतीचा जपू वसा घेऊ हेच हळदी-कुंकवाचे वाण...’ हा उखाणा म्हणत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांसह इतर महिला कर्मचाऱ्यांना ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण दिले.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे नेहमीच विविध स्तरावर एचआयव्हीबाबत जनजागृती उपक्रम राबविले जातात; पण ज्यांचा नेहमीच रुग्णांशी संबंध येतो अन् रक्त संक्रमणातून त्यांना एचआयव्हीसारख्या आजारांचा धोका संभावतो, अशा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया महिलांमध्येही एचआयव्हीबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या रिना धोटे, सविता बोरकर, सुमेरा खान, आरती पाठक यांच्यासह इतर महिला कर्मचाऱ्यांनी राबविला.८० पेक्षा जास्त महिला कर्मचाºयांचा सहभागजिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे आयोजित हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात ८० पेक्षा जास्त महिला कर्मचाºयांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहभागी महिला कर्मचाºयांना वाणात एचआयव्हीबाबत माहिती देणारी माहिती पुस्तिका देण्यात आली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभागातील महिला कर्मचाºयांसह नर्सिंग कॉलेजमधील महिला कर्मचारी व परिचारिकांचा समावेश होता.

अशीही होणार जनजागृतीहळदी-कुंकूच्या कार्यक्रमानंतर सहभागी प्रत्येक महिला कर्मचारी त्यांच्या संपर्कात येणाºया महिलांमध्ये याबाबत जनजागृती करणार आहेत. त्यामुळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या या छोट्याशा उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला