शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

अकोला शहरातील होर्डिंग काढण्याचा ‘स्थायी’चा ऐतिहासिक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:08 IST

अकोला: मनपा प्रशासनाने कोणत्याही निकष, नियमांची पूर्तता न करता शहरात होर्डिंगची खिरापत वाटली. महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल त्या ठिकाणी प्रशासनाने होर्डिंग उभारण्यासाठी अनेक एजन्सींना परवानगी बहाल केली. प्रत्यक्ष क्षेत्रफळासाठी दिलेली परवानगी व एजन्सी संचालकांनी उभारलेल्या होर्डिंगमध्ये प्रचंड तफावत असून, हा प्रकार म्हणजे संगनमताने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार असल्याचे निरीक्षण नोंदवत शहरातील संपूर्ण होर्डिंग काढण्याचा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी मनपाच्या स्थायी समितीने घेतला. मोजक्या जागा निश्चित करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देपरवानगीच्या मुद्यावर प्रशासनाची दांडी गूल; वरिष्ठ अधिकारी संशयाच्या घे-यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मनपा प्रशासनाने कोणत्याही निकष, नियमांची पूर्तता न करता शहरात होर्डिंगची खिरापत वाटली. महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल त्या ठिकाणी प्रशासनाने होर्डिंग उभारण्यासाठी अनेक एजन्सींना परवानगी बहाल केली. प्रत्यक्ष क्षेत्रफळासाठी दिलेली परवानगी व एजन्सी संचालकांनी उभारलेल्या होर्डिंगमध्ये प्रचंड तफावत असून, हा प्रकार म्हणजे संगनमताने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार असल्याचे निरीक्षण नोंदवत शहरातील संपूर्ण होर्डिंग काढण्याचा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी मनपाच्या स्थायी समितीने घेतला. मोजक्या जागा निश्चित करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी प्रशासनाला दिले.मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवर जाहिरातींचे होर्डिंग, फलक उभारल्या जातात. त्यापासून मनपाला सुमारे ३० लाखांपर्यंत महसूल प्राप्त होतो. मागील वर्षभराच्या कालावधीत मनपाच्यावतीने विविध ठिकाणी होर्डिंग उभारण्यासाठी खिरापत वाटल्याचे दिसून येते. मनपाच्या दप्तरी १८७ संख्या असणारे होर्डिंग व विद्युत पोलवरील  १२९ फलकांना दरवाढ करून त्यांना मंजुरी देण्याचा विषय स्थायी समितीमध्ये पटलावर आला असता भाजप नगरसेवक अजय शर्मा, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काँग्रेस नगरसेवक पराग कांबळे यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. होर्डिंग, फलक उभारण्याचे नेमके निकष काय, त्यासाठी कोणकोणत्या यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते, ती घेतली का, आदी प्रश्न अजय शर्मा यांनी उपस्थित केले असता, अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील, नगररचना विभागाचे उपअभियंता राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी संजय थोरात  नगरसेवकांच्या कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, हे येथे उल्लेखनीय. होर्डिंगच्या मुद्यावर प्रशासनाची भूमिका पाहता संपूर्ण शहरातील होर्डिंग, फलक तातडीने काढण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. तसेच शहरात मोजक्या जागांवरच होर्डिंग उभारण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश सभापती बाळ टाले यांनी प्रशासनाला दिले. 

उडवाउडवीची उत्तरे!होर्डिंगच्या विषयाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळणारच, असा ग्रह करून आलेल्या प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचाºयांचा चांगलाच  हिरमोड झाला. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काही अधिकारी चांगलेच अस्वस्थ झाल्यामुळे त्यांची चिडचिड अन् उडवाउडवीची उत्तरे ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 

उत्पन्नाच्या नावाखाली विद्रूपीकरण४मनपाचे तत्कालीन उपायुक्त चंद्रशेखर चिंचोळीकर यांच्या कालावधीत मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग उभारणीला परवानगी देऊन त्यावर परवानगी  चिकटवणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. मागील वर्षभरात मुख्य रस्त्यांलगतच नव्हे तर चक्क मुख्य नाल्यातही होर्डिंगची खिरापत वाटण्यात  आल्याचा मुद्दा सभापती बाळ टाले यांनी उपस्थित केला. उत्पन्न वाढीच्या नावाखाली संपूर्ण शहरात होर्डिंग, फलक उभारून शहराचे विद्रूपीकरण  करणार का, असा सवाल उपस्थित करीत अतिरिक्त आयुक्त पाटील यांच्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.

शहरात ४०० पेक्षा जास्त होर्डिंग४प्रामाणिकतेचा आव आणणारे प्रशासन सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अजय शर्मा यांनी केला. १८७ होर्डिंग व विद्युत पोलवरील  १२९ फलकांमध्ये दरवाढ करणारे प्रशासन झोपेचे सोंग घेत असून, शहरात ४०० पेक्षा जास्त होर्डिंग असल्याची माहिती अजय शर्मा यांनी दिली.  ४शहरात महसूल विभागाच्या मालकीच्या जागेवर मनपाने होर्डिंग उभारणीसाठी परवानगी दिलीच कशी, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वाहतूक  शाखा, नगररचना विभागाची पूर्वपरवानगी घेण्यात आली का, एजन्सी संचालकांनी किती चौकांचे सौंदर्यीकरण केले, आदी प्रश्न अजय शर्मा यांनी उपस्थित केले असता, अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील उत्तरे देऊ शक ले नाहीत. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका