शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ जूनपासून गोव्यात हिंदू अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:23 IST

हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ जूनपासून गोव्यात सप्तम अ.भा. हिंदू अधिवेशन होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे१५0 हून अधिक हिंदू संघटनांचे पदाधिकारी गोव्यातील २ ते १२ जूनदरम्यान होणाऱ्या सप्तम हिंदू अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात अकोला जिल्ह्यातून २३ प्रतिनिधी, अधिवक्ता सहभागी होणार आहेत. अशी माहितीही श्रीकांत पिसोळकर यांनी दिली.

अकोला: जगामध्ये अनेक राष्ट्रे धर्मावर आधारित आहेत; परंतु या देशात ९0 कोटी हिंदू असूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी हिंदू राष्ट्र म्हणून भारताला घोषित करण्यात आले नाही. हिंदू राष्ट्र स्थापन व्हावे आणि त्याविषयीची दिशा निश्चित करण्यासाठी १९ राज्यांमधील संघटना एकत्र आल्या आहेत. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ जूनपासून गोव्यात सप्तम अ.भा. हिंदू अधिवेशन होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.पिसोळकर यांनी, जगामध्ये अनेक इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध धर्मीय राष्ट्रे आहेत; परंतु या देशात बहुसंख्यक असूनही आम्हाला हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही. केवळ मतांसाठी आणि सोयीच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगतात. भाजप सरकारने मुस्लिमांची हज यात्रेची सबसिडी बंद करून त्यांना हज यात्रेसाठी ४0 टक्क्यांनी विमानाचे भाडे कमी केले. काश्मीरमधील हिंदू निर्वासिताचे जिणे जगत आहेत. गोहत्या बंदी केवळ कागदावर असून, या कायद्यामुळे गोहत्या थांबलेली नाही. हिंदू मंदिरांमधील कोट्यावधी रुपयांच्या देणग्यांचा हिशेब नाही. हा पैसा जातो, कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळेच आता हिंदू जनजागृती समितीने १९ राज्यांमधील हिंदू संघटना एकत्र केल्या आहेत. यासह नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश येथील १५0 हून अधिक हिंदू संघटनांचे पदाधिकारी गोव्यातील २ ते १२ जूनदरम्यान होणाऱ्या सप्तम हिंदू अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामध्ये हिंदूंचे संरक्षण, मंदिर रक्षण, इतिहासाचे रक्षण, धर्मांतरण, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन यासह हिंदूंचे युवा संघटन, संत संघटन आणि हिंदू राष्ट्राची स्थापना याविषयी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात अकोला जिल्ह्यातून २३ प्रतिनिधी, अधिवक्ता सहभागी होणार आहेत. अशी माहितीही श्रीकांत पिसोळकर यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हा सेविका मेघा जोशी, अ‍ॅड. प्रशांत गोरे, निधी बैस, श्याम राजंदेकर, अजय खोत, धीरज राऊत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाgoaगोवा