शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर मदत मागणार्‍याला कारने चिरडले!

By admin | Updated: September 16, 2014 18:21 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मधापुरी फाट्यानजीक घटना

कुरुम: कार नादुरुस्त झाल्यानंतर मदतीसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका खासगी कृषी कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकास भरधाव कारने चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मधापुरी फाट्यानजीक रविवार, १४ सप्टेंबरच्या रात्री घडली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टल या खासगी कृषी कंपनीत अकोला विभाग व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले अजय केशवराव पवार (४0, रा. अमरावती) हे रविवारी सायंकाळी त्यांचा मित्र नीलेश भाऊराव राऊत व अन्य एका मित्रासोबत अमरावतीहून कुरुम येथील हॉटेल जयकारा येथे कंपनीच्या एम. एच. ३0 ए. एफ. ६९३८ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने येत असताना त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कार उभी करून महामार्गावरून जात असलेल्या एखाद्या वाहनचालकाकडे मदत मागण्यासाठी अजय पवार हे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या एम. एच. ३१ डी. सी. ७२९४ क्रमांकाच्या कारने अजय पवार यांना जोरदार धडक दिली. त्यात अजय पवार जागीच ठार झाले. यावेळी कारचालकाने घटनास्थळाहून पलायन केले. पवार यांचे मित्र नीलेश राऊत यांच्या फिर्यादीवरून, माना पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक कामताप्रसाद मिश्रा, पो.कॉ. सुमेद मोहोड तपास करीत आहेत. (वार्ताहर)