येथील शिवाजी चौकात विद्युत रोषणाईसाठी काही वर्षांपूर्वी ३० ते ३५ फूट उंच लोखंडी खांब उभारण्यात आले होते. गत अनेक दिवसापासून त्याचे काही नटबोल्ट निखळून पडले होते. हे ठिकाण अतिशय वर्दळीचे असल्याने या चौकात नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान, शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने गर्दीचे प्रमाण अधिक होते. सकाळी ११:१५ वाजताच्या दरम्यान एका टिप्परचा या खांबाला धक्का लागल्याने खांब जमिनीवर कोसळला. खांबाला टिप्परचा धक्का लागल्याचे पाहून अनेक जण तेथून बाजूला झाले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नाही. या घटनेत अनेक जण थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चौकात फळाच्या गाड्या, भाजीपाल्याची दुकाने व इतरही दुकाने आहेत. सुदैवाने त्याबाजूने खांब कोसळला नाही.
टिप्परच्या धक्क्याने हायमास्ट पथदिव्यांचा खांब कोसळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST