शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

राज्यात सर्वाधिक शेततळी पश्‍चिम विदर्भात

By admin | Updated: March 5, 2016 02:26 IST

मागेल त्याला शेततळे; पश्‍चिम विदर्भासाठी १३,२१५ शेततळ्यांचे लक्ष्यांक.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर दुष्काळावर मात करण्यासाठी जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात ५१ हजार ५00 शेततळ्यांचे लक्ष्यांक असून, सर्वाधिक शेततळी पश्‍चिम विदर्भात उभारले जाणार आहेत. २0१६-१७ मध्ये पश्‍चिम विदर्भात १३ हजार २१५ शेततळी उभारण्यात येणार आहेत. राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता, शेतकर्‍यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही वैयक्तिकलाभाची योजना राबविण्यात येत आहे. सन २0१६-१७ मध्ये ह्यमागेल त्याला शेततळेह्ण या योजनेंतर्गत राज्यात सुमारे ५१ हजार ५00 शेततळी उभारण्यात येणार असून, सर्वाधिक शेततळी उभारण्यासाठी विदर्भावर भर देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती विभाग व नागपूर विभागात एकूण २१ हजार ६९३ शेततळी उभारण्यात येणार आहेत. त्यातही पश्‍चिम विदर्भात १३ हजार २१५ शेततळी होणार असून, राज्यातील एकूण शेततळ्यांपैकी सर्वाधिक शेततळ्यांचे लक्ष्यांक पश्‍चिम विदर्भासाठी देण्यात आले आहे. अमरावती विभागानंतर लातूर विभागात ९ हजार ५९७, नागपूर विभागात ८ हजार ४७८, औरंगाबाद विभागात ६ हजार ६0३, नाशिक विभागात ५ हजार ९२८, पुणे विभाग ५ हजार ५८१ व सर्वांत कमी कोल्हापूर विभागात २ हजार ९८ शेततळी उभारण्यात येणार आहेत. ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील बीपीएल शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गत पाच वर्षांत एक वर्ष तरी ५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. गत तीन वर्षांपासून वारंवार दुष्काळ पडून पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी येत असल्याने या योजनेत पश्‍चिम विदर्भास प्राधान्य मिळत आहे. विदर्भातील जिल्हानिहाय शेततळेअमरावती विभागात १३ हजार २१५ शेततळी होणार असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २६११, अकोला २११0, वाशिम १८९२, अमरावती ३१५९ व यवतमाळ जिल्ह्यात ३४४३ शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. नागपूर विभागात ८४७८ शेततळी होणार असून, त्यामध्ये वर्धा जिल्ह्यात २0३४, नागपूर १८२९, भंडारा ८५२, गोंदिया ४६0, चंद्रपूर १९६३ आणि गडचिरोली जिल्ह्यात १३४0 शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे.