शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी विद्यापीठाला प्रलंबित खटल्यांची संख्या वाढविण्यात रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:11 IST

High court Slams Dr. PDKV कृषी विद्यापीठातील एका चौकीदाराच्या सेवानिवृत्ती वेतनासंदर्भातील खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयाने डॉ.पंदेकृविला फटकारले

ठळक मुद्देकर्मचारी हित न जपणऱ्या सर्व संस्थांवर परखड टिपणी केली आहे.सहा महिन्यात वेतन व इतर लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अकोला : कायदेशीर स्थितीबद्दल माहिती असूनचही कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय अधिकारासाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडणाऱ्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि अशा संस्थांना दंडात्मक आकार लावण्याची वेळ आली आहे, असे परखड शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी विद्यापीठ प्रशासनाला खडसावले. कृषी विद्यापीठाला केवळ प्रलंबित खटल्यांची संख्या वाढविण्यात रस असल्याचे मतही न्यायालयाने कृषी विद्यापीठातील एका चौकीदाराच्या सेवानिवृत्ती वेतनासंदर्भातील खटल्याची सुनावणी करताना १० डिसेंबर रोजी नोंदविले.कुलगुरू डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या विरोधात २०१६ मध्ये दाखल केलेली रीट याचिकाबाबत निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी विद्यापीठाबरोबरच कर्मचारी हित न जपणऱ्या सर्व संस्थांवर परखड टिपणी केली आहे.कुलगुरू डॉ. पंदेकृवि सारख्या संस्थंची कर्मचाऱ्यांच्या दयनीय परिस्थितीबाबत असलेली औदासिन्यता आणि उदासिनता आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यास भाग पाडणारी प्रवृत्ती दर्शवण्यासाठी न्यायालयाने आपले परखड मत नोंदवले. कायद्यानुसार निर्णय घेण्याची जाणवीपूर्वक कृती केल्यास विद्यापीटाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता आणि त्याचबरोबर खर्च आणि खर्चच नव्हे तर अश खटल्यासाठी लागणारा वेळ, प्रयत्न आणि मनुष्यबळ याचेही जतन झाले असते. जाणीवपूर्वक कृती केल्यास वेळ आणि प्रयत्नांची बचत होऊन संस्थंचादेखील त्याचा फायदा झाला असता, असे मत न्यायालयाने नोंदविले.आत्मपरीक्षण करण्याची गरजकृषी विद्यापीठासारख्या संस्थांनी आता आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असून, अनावश्यक खटले टाळण्याकरिता योग्य ते पावले उचलली पाहिजेत. कायदा आणि न्यायालय निर्णयाची साधी भाषा समजून ते पक्ष आहे त्या प्रकरणात समोर जायचे की नाही, याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवले.काय आहे प्रकरणसय्यद अब्बास सय्यद उस्मान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी निर्णय देताना वरील परखड मत नोंदवले आहे. सय्यद अब्बास हे १९७१ पासून कृषी विद्यापीठात रोजंदारीवर चौकीदार होते, १९९६ मध्ये त्यांना विद्यापीठाने नियमित केले. दोन वर्षाचा परीक्षा परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केल्यानंतर १९९८ मध्ये ते नियमित झाले व २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. दरम्यान त्यांनी सेवानिवृत्तीचे लाभ व सेवानिवृत्ती वेतनासाठी त्यांनी केलेला अर्ज विद्यापीठाने फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने नोंदवले की, अशा प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक आदेश यापूर्वी आले असूनदेखील या प्रकरणी कृषी विद्यापीठ आपल्या स्तरावर हे प्रकरण निकाली न काढता न्यायालयात खटला चालवण्यात उत्साह दाखवत आहे, ही बाब योग्य नाही. सय्यद अब्बास यांचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज तयार करून त्यांना सहा महिन्यात वेतन व इतर लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठHigh Courtउच्च न्यायालय