शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

अकोला : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. यादरम्यान ऑटाेरिक्षाचालकांना आर्थिक संकटाचा सामना ...

अकोला : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. यादरम्यान ऑटाेरिक्षाचालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी परवानाधारकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्यापही ही मदत ऑटोचालकांना मिळाली नसल्याने मदत केव्हा मिळणार, असा सवाल ऑटोचालक करीत आहेत.

जिल्ह्यातील १३ हजार ६२५ ऑटाेरिक्षाचालकांना या निर्णयाचा लाभ हाेणार होता. मात्र, जिल्ह्यातील यापैकी केवळ ५९४० ऑटोचालकांनी परवान्याचे नूतनीकरण केल्यामुळे त्यांनाच हा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. इतर ऑटोचालकांना हा लाभ मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गत वर्षीपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने ऑटाेरिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्च महिन्यापासून शासनाने निर्बंध लावणे सुरू केले आहे. त्यातच काेराेना रुग्ण वाढत असल्याने १५ एप्रिलपासून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. सरकारने ऑटाेचालकांना मदत देण्याची घाेषणा केली असली तरी इतरांचे काय, असा प्रश्न पडला आहे. मात्र, ऑटोचालकांना जाहीर केलेली मदत अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने ही मदत तातडीने देण्याची मागणी ऑटोचालकांकडून करण्यात येत आहे.

---------------------

गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, बँकांचे हप्तेही भरू शकलाे नाही. सरकाने १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत ताेकडी आहे. ही मदत अद्यापही खात्यात जमा झाली नाही.

- जय राठोड, ऑटाेचालक

------------------------

सरकारने जाहीर केलेल्या मदतीमुळे ऑटाेचालकांना दिलासा मिळाला. मात्र, रक्कम खात्यात जमा झाली नाही. नाेंदणीकृत ऑटाेचालकांनाच ही मदत मिळणार असल्याने खासगीमध्ये ऑटाे चालवणाऱ्यांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे सरसकट ऑटाेचालकांना सरकारने मदत द्यावी.

- बाबूराव शेळके, ऑटाेचालक

------------------------------

सततच्या लाॅकडाऊनमुळे ऑटाेचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने मदत देण्याची घाेषणा केल्याने ऑटाेचालकांना दिलासा मिळणार आहे. अनेक युवक भाड्याने ऑटाे घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच ही मदत अद्याप प्राप्त झाली नाही.

- राहुल इंगळे, ऑटाेचालक

------------------------------------------

जिल्ह्यातील परवानाधारक

रिक्षाचालकांची संख्या

१३६२५

वैध असलेले परवानाधारक

५९४०

शासनाकडून आटोचालकांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार अकोल्यातील परवानाधारक आटोचालकांची माहिती शासनाला सादर करण्यात आली आहे. त्यांच्या खात्यात मदत देण्याची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून होणार आहे.

-गोपाल वरोकार,

डेप्युटी आरटीओ, अकोला